agrowon news in marathi, sugar rates increased by 100 rupees, Maharashtra | Agrowon

बफर स्टॉकच्या शक्‍यतेने साखर १०० रुपयांनी वधारली
टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 मे 2018

कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून मंदीच्या सावटात असणाऱ्या साखरदराच्या किमतीत सोमवारी (ता. २१) क्विंटलमागे सुमारे १०० रुपयांची वाढ झाली. सरकार बफर स्टॉक तयार करण्याच्या मानसिकतेत असल्याची चर्चा सुरू झाल्याने ही वाढ झाल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. सोमवारी (ता. २१) विविध बाजारपेठांत साखरेस २६०० ते २७५० रुपये इतका दर होता. 

कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून मंदीच्या सावटात असणाऱ्या साखरदराच्या किमतीत सोमवारी (ता. २१) क्विंटलमागे सुमारे १०० रुपयांची वाढ झाली. सरकार बफर स्टॉक तयार करण्याच्या मानसिकतेत असल्याची चर्चा सुरू झाल्याने ही वाढ झाल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. सोमवारी (ता. २१) विविध बाजारपेठांत साखरेस २६०० ते २७५० रुपये इतका दर होता. 

गेल्या अनेक महिन्यांपासून साखरेचे दर पडून असल्याने कारखानदार अडचणीत आहेत. यातच कमी दराने साखर विक्री होत नसल्याने कारखान्यांनी विक्रीबाबत वेट ॲँड वॉचचे धोरण स्वीकारले आहे. अडीच हजार रुपयांच्या खाली साखर विक्री करणे परवडत नसल्याने कारखान्यांनी विक्रीबाबत लवचिक धोरण स्वीकारले आहे. गेल्या दोन दिवसांपासून शासकीय पातळीवरून केंद्र तीस लाख टनांचा बफर स्टॉक करेल.

साखरेच्या किमान विक्रीच्या दराबबाबत काही तरी निर्णय घेईल, अशा चर्चा सध्या बाजारपेठांमध्ये सुरू झाल्या आहेत. बफर स्टॉकची घोषणा होण्याअगोदर मिळेल त्या दरात साखर खरेदीसाठी काही व्यापारी सरसावले. तातडीने साखर आणण्यासाठी व्यापाऱ्यांनी दरातही शंभर रुपयांच्या आसपास वाढ केल्याने गेल्या काही दिवसांच्या तुलनेत दिल्लीसह अन्य काही बाजारपेठांत सोमवारी थोडे समाधानकारक वातावरण पाहायला मिळाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील वीस ते एकवीस कारखान्यांनी सुमारे नऊशे क्विंटल साखरेची विक्री केली केली. हा माहोल आणखी काही दिवस राहिल्यास अनेक कारखाने थोड्या थोड्या प्रमाणात तरी साखर विक्रीस काढतील अशी शक्‍यता आहे. 

बैठका शक्‍य
सध्या अतिरिक्त साखरेमुळे राज्यातील कारखानदार अडचणीत आले आहेत. साखर आयुक्तालयांच्या वतीने यातून मार्ग काढण्यासाठी सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक होण्याची शक्‍यत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही साखर उद्योगाबाबत काही दिवसांत पंतप्रधानांना भेटतील, अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
धन जोप्या पाऊस, पीक मरू देईना अन्‌ वाचू...झळा दुष्काळाच्या : जि, परभणी यंदा पावसात कसा जोर...
राज्यात सर्वदूर पाऊसपुणे ः राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (...
बेबाकी प्रमाणपत्राशिवाय राष्ट्रीय...मुंबई: पाऊस न पडल्याने आधीच त्रस्त असलेल्या...
मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर सर्वदूर पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर...
अजातशत्रूदेशाच्या राजकारणात आपल्या शालीन, सभ्य राजकारणाने...
बोंड अळी नियंत्रणासाठी...पुणे : राज्यात कपाशीतील बोंड अळीचे संकट वाढण्याची...
‘अटलपर्वा’चा अस्तनवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
शेततळी झाली, शेती बागायती झालीसध्या राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
मध्यस्थविरहीत विक्री व्यवस्था उभी...अकोला येथे कार्यरत असलेल्या स्नातकोत्तर पशुवैद्यक...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी कालवशनवी दिल्ली : प्रखर देशभक्त, भारतरत्न, माजी...
अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनकनवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून एम्स...
देशाचा विकास वेगाने होतोय : राष्ट्रपतीनवी दिल्ली : ''देशातील परिस्थिती झपाट्याने...
स्वातंत्र्य संग्रामातील ग्रामीण सहभागब्रिटिश सत्तेविरोधी स्वातंत्र्य चळवळीत केवळ शहरी...
सापळ्यात अडकलाय शेतकरीयावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात बीटी कापसावर एक...
नाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...
पुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...
राज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...
शेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...
इथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...