agrowon news in marathi, swabhimani milk sangh say no to cow milk, Maharashtra | Agrowon

स्वाभिमानी दूध संघाचा गाईचे दूध स्वीकारण्यास नकार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 28 मे 2018

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी संस्थापक असलेल्या स्वाभिमानी दूध संघाने १ जून पासून ज्या संस्था म्हशीचे दूध स्वत: विक्री करतात आणि गाईचे दूध स्वभिमानीला देतात अशा पन्नास दुग्ध संस्थांना १ जून पासून गाईचे दूध संघास घालू नये, असे पत्रक काढले आहे. दुधाच्या दरासाठी लढा देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेच असा आदेश दुग्ध संस्थांना काढल्याने उत्पादकांत आश्‍चर्य व्यक्त होत  आहे.

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी संस्थापक असलेल्या स्वाभिमानी दूध संघाने १ जून पासून ज्या संस्था म्हशीचे दूध स्वत: विक्री करतात आणि गाईचे दूध स्वभिमानीला देतात अशा पन्नास दुग्ध संस्थांना १ जून पासून गाईचे दूध संघास घालू नये, असे पत्रक काढले आहे. दुधाच्या दरासाठी लढा देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेच असा आदेश दुग्ध संस्थांना काढल्याने उत्पादकांत आश्‍चर्य व्यक्त होत  आहे.

जिल्ह्यात गाईच्या दुधाला ३.५ ला फॅटला २५ रुपये दर दिला जातो. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात गाईचे दूध अतिरिक्त होत आहे. पावडरीलाही दर नसल्याने पावडर प्लॅन्ट धारकही दूध खरेदी करण्यास तयार नाही किंवा कमी किमतीने दूध खरेदी करत असल्याने संघाचा गाईच्या दुधापासून होणारा तोटा वाढल्याचे संघाचे मुख्य कार्यकरी अधिकारी महावीर पाटील यांनी सांगितले. जादा दराने दूध खरेदी करून कमी दरात त्याची विक्री करण्याची वेळ संघावर आल्याने संघ आर्थिक नुकसानीत जाण्याअगोदर आम्ही दुग्ध संस्थांना याबाबतच्या सूचना दिल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. 

संघाकडे जवळ जवळ ३६ हजार लिटर गाईच्या दुधाचे संकलन होते. यापैकी बरेचसे दूध विक्री अभावी शिल्लक राहात असल्याने दररोज हजारो रुपयांचा तोटा आम्हाला होत आहे. हे सहन करणे शक्‍य नसल्याने केवळ गाईच्या दुधाचा पुरवठा करणाऱ्या दुग्ध संस्थांना आम्ही दूध पाठवू नका, अशा सूचना केल्या आहे. ज्या दुग्ध संस्था म्हैस आणि गाय या दोन्हीचे समान पद्धतीने दूध पाठवतात त्यांचे दूध मात्र आम्ही घेणार असल्याचे श्री. पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले.

अन्य संघांकडून निर्बंध नाहीत
स्वाभिमानीने हा निर्णय घेऊन उत्पादकांना झटका दिला असला, तरी इतर संघांनी मात्र सध्या तरी गाईचे दूध खरेदी बंद करण्याबाबत आमचा विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात गोकुळ, वारणासह अन्य सहकारी संस्था आहेत. या संस्थांनाही अडचणी असल्या, तरी सभासद संख्या जास्त आहे. यामुळे या संस्था गाय दूध न स्वीकारण्याचा निर्णय घेण्याची शक्‍यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक थांबणार कधी?नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मुख्य अर्थकारण...
यवतमाळच्या अनिकेतने तयार केला फवारणीचा...यवतमाळ ः फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधा सर्वदूर...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर...पणजी : गेल्या एक वर्षापासून अधिक काळ...