agrowon news in marathi, Swabhimani stage protest in central bank, Maharashtra | Agrowon

‘स्वाभिमानी’चे सेंट्रल बँकेसमोर अांदोलन
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जून 2018

बुलडाणा ः दाताळा (ता. मलकापूर) येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत व्यवस्थापकाने पीककर्जाच्या बदल्यात शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी केल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली असतानाच, शनिवारी (ता. २३) स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बँकेचे फलक फाडून काळे फासले. स्वाभिमानी'च्या कार्याकर्त्यांनी या बँक परिसरात घोषणाबाजी करीत कारवाईची मागणी केली. 

बुलडाणा ः दाताळा (ता. मलकापूर) येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत व्यवस्थापकाने पीककर्जाच्या बदल्यात शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी केल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली असतानाच, शनिवारी (ता. २३) स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बँकेचे फलक फाडून काळे फासले. स्वाभिमानी'च्या कार्याकर्त्यांनी या बँक परिसरात घोषणाबाजी करीत कारवाईची मागणी केली. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार, राणा चंदन, प्रदीप शेळके यांच्यासह कार्यकर्त्यांना मलकापूर पोलिसांनी या अांदोलन प्रकरणी ताब्यात घेतले. पीककर्ज मंजूर करून देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करण्याचा प्रकार सेंट्रल बँकेच्या दाताळा शाखेत समोर अाला होता.  

या प्रकरणी दाताळा गावातील शेतकरी त्याच्या पत्नीसोबत पीककर्जासाठी गुरुवारी (ता.२१) सेंट्रल बँकेच्या शाखेत गेला होता. कागदपत्रांची पाहणी करून तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना बँक व्यवस्थापकाने केली. संबंधित शेतकऱ्याने त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. त्यावर शाखाधिकाऱ्याने अश्लिल संभाषण करून शरीरसुखाची मागणी केल्याचा अारोप अाहे. शाखाधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी केली. मोबदल्यात पीककर्जासोबत वेगळा पॅकेज देईन, असा निरोप शिपायामार्फत महिलेला पाठविला होता.

संबंधित महिलेने बँक व्यवस्थापकाशी झालेल्या संवादाचे रेकॉर्डिंग करून मलकापूर ग्रामीण पोलिसात तक्रार दिली अाहे. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक बी. आर. गावंडे यांनी शाखाधिकारी राजेश हिवसे व शिपाई मनोज चव्हाण या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली अाहे. शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दाताळा येथे बँकेवर धाव घेतली. राजेश हिवसेला बडतर्फ करून अटक करण्याची मागणी केली. ही कारवाई न केल्यास बँकेचा कारभार चालू देणार नसल्याचा इशारा दिला.  
 

इतर ताज्या घडामोडी
सूज, जखमांवर काळी अळू उपयुक्त स्थानिक नाव    : काळी अळू...
खानदेशातील पपई पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार : पपई दरांमध्ये दर आठवड्याला...
जालन्यात कृषिमाल निर्यात केंद्र सुरू जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रॅक्‍टर, पॉवर...कोल्हापूर/गडहिंग्लज : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर...
औरंगाबादेत खरबूज प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
विद्यापीठांपेक्षा शेतकरी संशोधनात...सांगली : सध्या विद्यापीठाच्या तंत्रज्ञानापेक्षा...
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला...महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार...जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (...
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणामपांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून...
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोधनाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल...
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू...टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील...
शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन...सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे...
आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा...सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर...
अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच...पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य...
छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्यानगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी...
जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटकाचितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी...
परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत,...श्रीनगर : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी...