agrowon news on marathi, temperature decreased due to cloudy weather, Maharashtra | Agrowon

ढगाळ हवामानामुळे तापमानात घट
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 मे 2018

पुणे : राज्यात असलेल्या ढगाळ हवामानामुळे तापमानात घट झाली अाहे. पूर्वमोसमी पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली आहे. उन्हाचा चटका कायम असला तरी विदर्भात आलेली उष्णतेची लाट अोसरली आहे. रविवारपर्यंत (ता. २०) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तर शुक्रवारपर्यंत (ता. १८) मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : राज्यात असलेल्या ढगाळ हवामानामुळे तापमानात घट झाली अाहे. पूर्वमोसमी पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली आहे. उन्हाचा चटका कायम असला तरी विदर्भात आलेली उष्णतेची लाट अोसरली आहे. रविवारपर्यंत (ता. २०) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तर शुक्रवारपर्यंत (ता. १८) मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मंगळवारी (ता. १५) सायंकाळनंतर सोलापूर, सांगली, कोल्हापुरात पावसाने हजेरी लावली होती. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील येळवी परिसरामध्ये गारांसह झालेल्या पावसाने द्राक्ष बांगाचे मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी (ता. १६) दुपारनंतर सांगली शहरासह परिसरामध्ये पावसाला सुरवात झाली होती. सातारा, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यात दाट होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही ढग गोळा होऊ लागले होते.

ढगाळ हवमानामुळे तापमानात काहीशी घट झाली असून, चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान अरबी समुद्रामध्ये नैर्ऋत्य भागात असलेले कमी दाबाचे क्षेत्र अदानच्या खाडी आणि परिसरावर होते. त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. शुक्रवारी हे कमी दाबाचे क्षेत्रा येमेनच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. पूर्व उत्तर प्रदेशापासून विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

बुधवारी (ता. १६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.१, जळगाव ४२.५, कोल्हापूर ३६.८, महाबळेश्वर ३१.८, मालेगाव ४१.६, नाशिक ३७.६, सांगली ३७.४, सातारा ३८.२, सोलापूर ३९.७, मुंबई ३४.०,अलिबाग ३५.४, रत्नागिरी ३४.१, डहाणू ३४.७, आैरंगाबाद ३९.७, परभणी ४१.४, नांदेड ४२.५, अकोला ४३.०, अमरावती ४२.६, बुलडाणा ४०.८, चंद्रपूर ४४.०, गोंदिया ४१.०, नागपूर ४२.२, वर्धा ४३.०, यवतमाळ ४२.२.

इतर अॅग्रो विशेष
साखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...
खरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव  : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...
खोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...
जमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...
मोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...
मंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...
गेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...
उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...
पूर्व विदर्भात पावसाला पाेषक हवामानपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण...
कांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडेनाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित...
खानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ...जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी...
अडत्याकडून ‘टीडीएस’ कपातीची बाजार...धुळे  : शेतकऱ्यांकडून शेतमाल विक्रीनंतर...
अमरावती विभागात महिन्यात हजारवर शेतकरी...अकोलाः सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि या वर्षी...
‘शेतकऱ्यांच्या प्रश्नी आमदार-...परभणी  : उसाला एफआरपीनुसार दर देण्यात यावा,...
ऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्यपुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप...
जागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...
पाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...
विदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...
मराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...
खानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...