संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढ

दुध
दुध

पुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या पॅकेजनंतर खासगी आणि सहकारी दूध संघांनी २१ जुलैपासून खरेदी दरात ३ रुपयांनी वाढ केल्याची घाेषणा केली, तर पावडर निर्यात सुरू झाल्यानंतर आणि जीएसटी कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने एक एक रुपयांची वाढ करत अंतिम वाढ ५ रुपये देऊ, अशी माहिती संघाच्या प्रतिनिधींच्या वतीने साेनई दुधाचे दशरथ माने यांनी पत्रकार परिषदेमध्ये शनिवारी (ता. १४) रात्री दिली. निर्णयाची माहिती देताना माने म्हणाले, की दूधदरावर ताेडगा काढण्यासाठी कृषी मूल्य आयाेगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि  पीयूष गाेयल यांच्या मध्यस्थीनंतर शासनाने विविध मागण्या मान्य केल्या.  यामध्ये पावडर निर्यातीसाठी प्रतिकिलाे ५० रुपये अनुदान, शालेय पाेषण आहारात दुधाचा वापर, आणि जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणण्यासाठी आश्‍वासन दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दुधाचा दर वाढवून मिळावा म्हणून खासगी आणि सहकारी दूध संघाच्या वतीने २१ जुलैपासून प्रतिलिटर ३ रुपये दरवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर प्रत्यक्षात दूध पावडर निर्यात सुरू झाल्यानंतर आणि जीएसटीचे दर कमी झाल्यानंतर या दाेन्ही टप्प्यामध्ये एक एक रुपया वाढ देऊन, प्रत्यक्षात ही वाढ ५ रुपये देण्याचा प्रयत्न असणार आहे. बैठकीला स्वराज दूधचे रणजितसिंह नाईक निंबाळकर, गाेविंदचे राजीव मित्रा, डायनॅलाॅगचे प्रवीण आैटी, प्रभातचे विवेक निमळ, परागचे संजय मिश्रा, बारामतीचे हनुमंत शेळके, ऊर्जाचे प्रकाश कुतवळ, पुणे जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष गाेपाळ म्हस्के, मुख्यमंत्री सल्लागार समितीचे राजेश लेले, यांच्यासह वारणा, गाेकूळ, रिअल, मळगंगा, नॅचरल, वैष्णव, सुरुची, एस. आर. दूधचे प्रतिनिधी उपस्थित हाेते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com