agrowon news in marathi, Turmeric sowing stop due to rain , Maharashtra | Agrowon

पावसामुळे हळद लागवड थांबली
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 जून 2018

​गेल्या वर्षी जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात घट झाली होती. यंदा वेळेत पाऊस सुरू झाल्याने हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता आहे; परंतु यंदा हळदीच्या दरात मोठी घसरण झाली. यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन चुकले आहे. पुढील हंगामात दरात वाढ होण्याची शक्यता फार कमी असल्याचे सध्यातरी दिसते आहे. 
- शशिकांत औटी, हळद उत्पादक, मौजे डिग्रज, ता. मिरज, सांगली.

सांगली ः राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाल्याने हळद लागवड थांबली आहे. हळदीची आतापर्यंत १५ हजार हेक्‍टरवर लागवड झाली आहे. गतवर्षी याच काळात सुमारे १८ हजार हेक्‍टरवर लागवड झाली होती. तसेच यंदाच्या हंगामात दोन हजार हेक्‍टरने हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता हळद संशोधन केंद्राच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. 

गेल्या वर्षी राज्यात पाणीटंचाई आणि वेळेत पाऊस नसल्याने हळदीच्या क्षेत्रात घट झाली होती. त्यामुळे त्याचा परिमाण उत्पादनावरही झाला होता. परिणामी, हळदीच्या दरात वाढ झाली होती. हंगामाच्या सुरवातीलाच हळदीच्या दरात दीड हजार रुपये प्रतिक्विंटलने वाढ झाली होती. दर १० ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत गेले. परंतु दरात चढऊतार आला.

सध्या हळदीचे दर कमी असल्याने शेतकऱ्यांनी हळदीची साठवणूक केली आहे. त्यामुळे राज्यात हळदीची सुमारे ३ ते ४ लाख पोती शिल्लक आहेत. यंदा अवकाळी पाऊस आणि वेळेत पाऊस झाल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांनी हळद लागवडीचे नियोजन केले. राज्यात आतापर्यंत १५ हजार हेक्‍टरवर हळदीची लागवड झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस असल्याने सध्या हळद लागवड थांबली आहे. 

सांगलीत क्षेत्रात वाढ
जिल्ह्यात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील उर्वरित भागात हळद लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे आले आहे. जिल्ह्यात गतवर्षी हळदीचे क्षेत्र एक हजार हेक्‍टर होते. यंदाच्या हंगामात उपलब्ध पाणी आणि वेळेत झालेला पाऊस यामुळे  हळदीच्या क्षेत्रात पाचशे हेक्‍टरने वाढ झाली आहे. हळदीच्या क्षेत्रात अजून वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. 

प्रतिक्रिया
पाऊस झाल्याने लागवड करण्यासाठी वाफसा नाही. हळद उत्पादकांनी २० जूनच्या अगोदर लागवड करावी. यंदा वेळेत पाऊस सुरू झाल्याने राज्यातील हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता आहे.
- डॉ. मनोज माळी, प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज, जि. सांगली.
 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...