agrowon news in marathi, use home seed this year, Maharashtra | Agrowon

यंदा वापरा घरचेच सोयबीन बियाणे
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 मे 2018

पुणे : राज्यात गेल्या हंगामात झालेल्या अवेळी पावसामुळे सोयाबीन बियाणे कमी प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टंचाई जाणवल्यास शेतकऱ्यांनी स्वतः जवळील बियाणे वापरावे, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे. 

राज्याचे प्रभारी गुणनियंत्रण संचालक म. स. घोलप यांच्या म्हणण्यानुसार, सोयाबीनमधील सर्व वाण सरळ वाण असल्यामुळे अशा वाणांच्या उत्पादनापासून पुढील २-३ वर्षे तेच बियाणे पुन्हा वापरता येते. ग्रामबीजोत्पादनातून तसेच पीक प्रात्यक्षिकांमधून शेतकरी गटांनी उत्पादित केलेल्या सोयाबीनचा वापरदेखील बियाणे म्हणून करता येईल. 

पुणे : राज्यात गेल्या हंगामात झालेल्या अवेळी पावसामुळे सोयाबीन बियाणे कमी प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टंचाई जाणवल्यास शेतकऱ्यांनी स्वतः जवळील बियाणे वापरावे, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे. 

राज्याचे प्रभारी गुणनियंत्रण संचालक म. स. घोलप यांच्या म्हणण्यानुसार, सोयाबीनमधील सर्व वाण सरळ वाण असल्यामुळे अशा वाणांच्या उत्पादनापासून पुढील २-३ वर्षे तेच बियाणे पुन्हा वापरता येते. ग्रामबीजोत्पादनातून तसेच पीक प्रात्यक्षिकांमधून शेतकरी गटांनी उत्पादित केलेल्या सोयाबीनचा वापरदेखील बियाणे म्हणून करता येईल. 

‘सोयबीनचे बियाण्याचे बाह्य आवरण अतिशय नाजूक असल्यामुळे उगवण क्षमता चांगली राहण्यासाठी या बियाण्यांची हाताळणी मात्र शेतकऱ्यांनी व्यवस्थित करावी. प्रतिहेक्टरी बियाण्याचा दर ७५ किलोवरून ५० किलोवर आणण्यासाठी टोकन पद्धत किंवा प्लँटरचा वापर करावा, असेही कृषी खात्याच्या म्हणणे आहे. 

घरचे बियाणे वापरण्यापूर्वी १०-१५ किलो बियाण्याला प्रत्येकी २५० ग्रॅम रायझोबियम व पीएसबी लावून पेरणीपूर्वी तीन तास सावलीत वाळवावे. त्यानंतर पेरणीपूर्वी बियाण्यास ३ ग्रॅम थायरम लावावा. त्यामुळे बुरशी येणार नाही. ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच ३ ते ४ सेंटिमीटर खोलीपर्यंत सोयाबीनचे पेरणी करावी, असा सल्ला कृषी संचालक श्री. घोलप यांनी दिला आहे.

इतर अॅग्रो विशेष
राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...मुंबई : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...
नगर-नाशिकच्या धरणातून ‘जायकवाडी’त पाणी...मुंबई : ‘जायकवाडी’ धरणात पाणी सोडण्याचे आदेश...
गाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ जालना : जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा...
दुष्काळाच्या गर्तेत गुरफटला गावगाडाऔरंगाबाद : पावसाळ्यात पडलेले प्रदीर्घ खंड व...
दुष्काळ जाहीर करण्यासाठी पीक नुकसानीचा...नाशिक : दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारची...
मुंबईत १५ ला सर्वपक्षीय मेळावा ः नवलेकोल्हापूर: किसान सभेच्या पुढाकाराने १५...
दुष्काळ जाहीर करण्याबाबत टोलवाटोलवी ः...पुणे : राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती असूनही...
नव्या दुष्काळी संहितेमुळे राज्यातील...मुंबई: राज्यावर १९७२ च्या दुष्काळापेक्षाही...
हुमणी रोखण्यासाठी कृती आराखडा : कृषी...पुणे : राज्यात उसाच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे: राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका सातत्याने...
नव्या हंगामात ऊस गाळपासाठी ३१ साखर...पुणे : राज्यात नव्या गाळप हंगामासाठी आतापर्यंत ३१...
चौदा हजार गावांमधील भूजल पातळी चिंताजनकमुंबई : राज्य सरकारच्या भूजल सर्वेक्षण व...
बदलत्या काळात बनली कलिंगड शेती...पाण्याची उपलब्धता असताना चितलवाडी (जि. अकोला)...
संघर्ष, चिकाटी, एकोप्यातूनच लाभले...बलवडी (भाळवणी) (ता. खानापूर, जि. सांगली) जोतीराम...
'सकाळ'चे दिवाळी अंक अॅमेझॉनवर !पुणे : क्लिकवर चालणाऱया आजच्या जगात दिवाळी अंकही...
संपूर्ण देशातून मॉन्सून परतलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) रविवारी (ता...
डॉ. हद्दाड आणि डाॅ. नॅबार्रो यांना २०१८...पुणे : जगभरातील कुपोषित माता आणि बालकांना...
हुमणीग्रस्त ऊसक्षेत्र चार लाख हेक्टरवरपुणे ः राज्यात दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या...
पाणीटंचाईने संत्राबागांची होरपळअमरावती ः विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या...
उन्हाचा चटका वाढलापुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर कमाल...