agrowon news in marathi, vice president in Baramati today, Maharashtra | Agrowon

उपराष्ट्रपती आज बारामतीत
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जून 2018

बारामती ः उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू शुक्रवारी (ता. २२) बारामतीत येत आहेत. या वेळी ते विविध प्रकल्पांची माहिती घेणार असून, नेदरलॅंडमध्ये शिक्षण घेणाऱ्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशीही संवाद साधणार आहेत.

बारामती ः उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू शुक्रवारी (ता. २२) बारामतीत येत आहेत. या वेळी ते विविध प्रकल्पांची माहिती घेणार असून, नेदरलॅंडमध्ये शिक्षण घेणाऱ्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशीही संवाद साधणार आहेत.

शुक्रवारी सकाळी ते कृषी विज्ञान केंद्रास भेट देणार आहेत. त्यांच्या भेटीसंदर्भात ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी माहिती दिली. शारदानगर येथील इंडो डच प्रकल्पांतर्गत उभारलेल्या भाजीपाला गुणवत्ता केंद्राची पाहणी करणार आहेत. त्या ठिकाणचे टोमॅटो, रंगीत ढोबळीची तसेच माती विनाशेतीच्या प्रकल्पाची पाहणी करतील. त्यानंतर ११० एकरांवरील विविध प्रात्यक्षिकांचीही ते पाहणी करणार असून, माती पाणी परीक्षण, जैविक खतशाळा व टपाल खात्यामार्फत सुरू असलेल्या मातीपरीक्षणाच्या उपक्रमाची माहिती घेणार आहेत.

यानंतर ते कृषी विज्ञान केंद्राच्या मुख्य कार्यालयातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रास भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाची माहिती व तिची उपयुक्तता याची ते माहिती घेतील व कृषी महाविद्यालयास मंजूर झालेल्या राज्यातील पहिल्या अटल इनक्‍युबेशन सेंटर; तसेच अटल टिंकरिंग लॅबची माहिती घेणार आहेत. यानंतर ते विद्या प्रतिष्ठानमधील म्युझियम व तेथील माहिती घेऊन पुण्यास रवाना होतील.

कडेकोट पोलिस बंदोबस्त
उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी बारामतीत चोख बंदोबस्त असून, १३०० हून अधिक विविध पोलिस दलाचे अधिकारी, कर्मचारी यामध्ये असतील. ग्रामीण पोलिस दल, शीघ्र कृती दल, राज्य राखीव पोलिस दल, रेल्वे पोलिस दल, औद्योगिक सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. हा खासगी दौरा असल्याचे कारण देत प्रशासनाने या दौऱ्यामध्ये वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांनाही प्रवेश नाकारला आहे.

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
जांभरुण परांडे गावात जन्माला आली...अमरावती : जांभरुण परांडे (जि. वाशीम) येथे...
शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणारपुणे : राज्यात फळे भाजीपाल्याचे वाढते...
राज्यात आजपासून हरभरा खरेदी परभणी : नाफेड आणि विदर्भ सहकारी विपणन महासंघाच्या...
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
शेतीला मिळाली बीजोत्पादनाची साथबोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) गावशिवारात चंद्रशेखर...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...
पपईच्या बनावट बियाणेप्रकरणी चौघांना अटककोल्हापूर : नामवंत कंपनीच्या पपई बियाण्यांच्या...
उन्हाचा चटका वाढणार; नांदेडला तुरळक...पुणे : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाने...
वऱ्हाडात फळबागांवर चालू लागल्या कुऱ्हाडीअकोला : दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे जगणे...
'जलवर्धिनी' करतेय लोकशिक्षणातून जल...जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पाण्याचे संधारण आणि...
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....