agrowon news in marathi, vijaykumar says Atma will not shutdown, Maharashtra | Agrowon

‘आत्मा’ बंद करण्याचा विचार नाही ः कृषी सचिव विजयकुमार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 जुलै 2018

नागपूर ः कर्मचारी कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आल्याने ‘आत्मा’ बंद होणार अशी चर्चा रंगली आहे. परंतु, ‘आत्मा’ बंद करण्याचा कोणताच विचार नसून कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून शासकीय सेवेत बॅकडोअर एंट्री मिळविण्यावर नियंत्रणासाठीच्या प्रयत्नाअंतर्गंत ‘आत्मा’ची फेररचना केली जात असल्याची माहिती कृषी सचिव विजयकुमार यांनी दिली. 

नागपूर ः कर्मचारी कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आल्याने ‘आत्मा’ बंद होणार अशी चर्चा रंगली आहे. परंतु, ‘आत्मा’ बंद करण्याचा कोणताच विचार नसून कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून शासकीय सेवेत बॅकडोअर एंट्री मिळविण्यावर नियंत्रणासाठीच्या प्रयत्नाअंतर्गंत ‘आत्मा’ची फेररचना केली जात असल्याची माहिती कृषी सचिव विजयकुमार यांनी दिली. 

देशात कमी कृषी कर्मचारी असलेल्या राज्यांमध्ये कृषी विस्ताराचे काम प्रभावीपणे होत नव्हते. याची दखल घेत केंद्र सरकारने कृषी तंत्रज्ञान विस्ताराच्या उद्देशाने आत्माची संकल्पना पुढे आणली. राज्य सरकार स्तरावर याची अंमलबजावणी होते. हे काम प्रभावीपणे व्हावे याकरिता पहिल्या टप्प्यात आवश्‍यक तिथे कंत्राटी कर्मचारी भरणा करण्याच्या सूचना होत्या. विस्तारकामाला गती मिळाल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करून कृषी विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत पुढील कामे होणे अपेक्षित होते.

बिहारसह काही राज्यांमध्ये कृषी विभागात केवळ पाच ते सात हजारांवर कर्मचारी आहेत. त्या ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा गरजेची आहे. परंतु, महाराष्ट्रात कृषी खात्यात २७ हजारावर कृषी अधिकारी, कर्मचारी आहेत. अशा ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांची गरज काय? असा विचार पुढे आला. त्यासोबतच कंत्राटी कर्मचारी राबत असल्याचे सांगत शासन सेवेतील कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून जबाबदारी त्यांच्यावर ढकलण्याचे प्रकारही अनेक ठिकाणी घडले. परिणामी आत्माची फेररचना करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे विजयकुमार यांनी सांगीतले.

जिल्हा अधीक्षक पदसिद्ध प्रकल्प संचालक
‘आत्मा’करिता समांतर यंत्रणा निर्माण झाली होती. त्यामुळे कृषी विभागाचे मुख्य काम प्रभावित झाले. परिणामी, आता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हेच आत्माचे पदसिद्ध प्रकल्प संचालक राहतील. तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे उपसंचालक पद होते. त्यामुळे राज्यात तालुका कृषी अधिकाऱ्यांची पदे रिक्‍त दिसत होती. तर तालुका कृषी अधिकाऱ्यांची पदे भरलेली असल्याचे सांगत पदभरती मंडळ पदभरतीस मान्यता देत नव्हते, अशी विचित्र स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे तालुका कृषी अधिकाऱ्यांना प्राधान्य देत उपसंचालक पद काढली गेली.

इतर अॅग्रो विशेष
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...
ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...