agrowon news in marathi, waiting for rain till Friday, Maharashtra | Agrowon

राज्यात पावसाची शुक्रवारपर्यंत उघडीप ?
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 जुलै 2018

पुणे : मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेेकडे सरकत अाहे. शुक्रवारपर्यंत (ता. ६) हा कमी दाबाचा पट्टा हिमालय पर्वताच्या पायथ्यालगत सक्रिय राहणार आहे. यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण ४ ते ६ जूनपर्यंत कमी होऊन बहुतांश भागात उघडीप राहण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून, बुधवारी (ता. ४) मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली अाहे. 

पुणे : मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेेकडे सरकत अाहे. शुक्रवारपर्यंत (ता. ६) हा कमी दाबाचा पट्टा हिमालय पर्वताच्या पायथ्यालगत सक्रिय राहणार आहे. यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण ४ ते ६ जूनपर्यंत कमी होऊन बहुतांश भागात उघडीप राहण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून, बुधवारी (ता. ४) मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली अाहे. 

राज्यात पावसाने उघडीप दिली असतानाच कोकणात मात्र अनेक ठिकाणी जोर आहे. शनिवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरीतील कळकवणे येथे सर्वाधिक १२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, अनेक ठिकाणी ६० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. अरबी समुद्रात असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती महाराष्ट्राच्या किनाऱ्यापासून लक्षद्वीपर्यंत किनारपट्टीला समांतर असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे कोकणात पाऊस पडत आहे. 

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर मराठवाड्यात हलका पाऊस पडला. 

शनिवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्राेत कृषी विभाग) : 
कोकण : दहिसर ७५, कल्याण ४८, अप्पर कल्याण ४५, ठाकूरली ५१, भिवंडी ४०, उल्हासनगर ४८, खालापूर चौक ४२, वौशी ५६, खोपोली  ६१, पेण ६०, महाड ४०, नाटे ४१, तुडली ४०, खामगाव ५५, चिपळूण ४५, खेरडी ६२, रामपूर ४०, वाहल ८३, सावरडे ७४, असुरडे ८०, कळकवणे १२५, शिरगाव ६७, खेड ८२, कुलवंडी ५७, भारने ६२, दाभील ६८, धामनंद ९६, गुहाघर ४२, पटपन्हाले ५८, अबलोली ६०, मंडणगड ६८, म्हाप्रल ६०, देव्हरे ६४, कोटवडे ५८, मालगड ४२, टरवल ४९, मुरडव ४७, माखजन ५६, फुंगुस ५५, फनसावणे ४१, अंगवली ६०, कोडगाव ६८, देवली ४३, तेरहे ४२, राजापुर ४६, कोंडीया ४५, जैतापूर ४१, कुंभवडे ४३, भांबेड ५१, विलवडे ४०, देवगड ४०, मीतबंब ४५, श्रावण ५७, आचरा ७०, अमबेरी ६९, बांडा ४८, अंबोली ४०, मदुरा ४४, शिरोडा ८२, म्हापण ६३, वेटोरे ४४, कणकवली ५०, फोंडा ५३, सांगवे ३९, नांदगाव ६३, वागडे ४८, कसाल ५५, वलवल ६७, मानगाव ४४, पिंगुली ४६, वैभववाडी ६०, येडगाव ६९, भुईबावडा ५२. 
मध्य महाराष्ट्र : पारोळा ४४, पौड ३१, मुठे ३९, सोलापूर ४८, माढा ४२, बामणोली ३९, हेळवाक १०४, महाबळेश्‍वर ४५, तापोळा ४५, लामज ६८, करंजफेन ४३, आंबा ५२, गगनबावडा ४४. 
विदर्भ : पातुर्डा ३०, मुंडगाव ३९, अासेगाव ३४, तेल्हारा ३६, शिवणी ३७, कुरणखेड ३०, बार्शीटाकळी ५०, महान ४५, दाभा ४२, पिंजर ४८, खेर्डा ३०, हिवरखेड ३१, शेंदुर्जना ५६, पुसाळा ७६, भेंडा ६४, दर्यापूर ६३, माणिकवाडा ४८, सिताबार्डी ६१, गोधनी ३१, मोवाड ३७, गोंडपिंपरी ३२, कुंघाडा ४५, एटापल्ली ३२, कासंसूर ३४, मुरूमगाव ५७. 

इतर अॅग्रो विशेष
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...
कम पानी, मोअर पानी देणारे डाॅ. वने...नगर जिल्ह्यातील मानोरी येथील कृषिभूषण डॉ....
आसूद : पाणी वितरणाचे अनोखे मॉडेलरत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे रस्त्यावर दोन...
विकासाची गंगा आली रे अंगणी...खानदेशात जळगाव, जामनेर व भुसावळ या तालुक्‍यांच्या...
मराठवाड्यात सिंचनातले सर्वोच्च...परभणी जिल्ह्यात वरपूड येथील चंद्रकांत अंबादासराव...
होय, कमी पाण्यात विक्रमी ऊस !सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील प्रयोगशील ऊस...
राज्यात नीचांकी हरभरा खरेदीमुंबई : राज्यातील हरभरा उत्पादक...
सीमेवरील तणावाचा केळी निर्यातीला फटकारावेर, जि. जळगाव : जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळ...
ॲग्रोवनच्या ‘मराठवाड्यातलं इस्त्राईल :...जालना : कष्ट उपसणारी पहिली पिढी, पीक बदलातून...