राज्यातील १७०५ गावे, १३८५ वाड्यांमध्ये टंचाई

पाणीटंचाई
पाणीटंचाई

पुणे : उन्हाच्या झळा, घटलेली पाणीपातळी यामुळे एप्रिल, मे महिन्यांमध्ये वाढलेली टंचाई अद्यापही कायम आहे. कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. तर पुणे विभागासह, पूर्व विदर्भातील नागपूर विभागातही पाणीटंचाई भासत आहे. राज्यातील १ हजार ७०५ गावे, १ हजार ३८५ वाड्यांमध्ये टंचाई असून, टंचाईग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी १ हजार ७२१ टॅंकर सुरू करण्यात आल्याचे राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे सांगण्यात आले.   गतवर्षी झालेला पाऊस, पाणीसाठा, जलसंधारणाच्या कामांमुळे भूजल पातळीत झालेली वाढ यामुळे यंदा उशिरा टंचाई भासली. मात्र एप्रिल आणि मे महिन्यात पाणीटंचाईत चांगली वाढ झाल्याने तीव्रता गतवर्षीपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. गतवर्षी जून महिन्याच्या सुरवातीला राज्यातील १ हजार ६९० गावे आणि ३ हजार ९९९ वाड्यांसाठी १ हजार ५६८ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता.  गतवर्षी पावसाने ओढ दिलेल्या पश्‍चिम विदर्भातील अमरावती आणि मराठवाड्यातील औरंगाबाद विभागात यंदा सर्वाधिक टंचाई असून, त्या पाठोपाठ नाशिक आणि कोकण विभागाला टंचाईचा सामना करावा लागत आहे. पुणे आणि नाशिक विभागात टंचाई तुलनेने कमी अाहे. कोकण विभागातील सिंधुदुर्ग, पुणे विभागातील सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील उस्मानाबाद, नागपूर विभागातील गोंदिया, भंडारा, गडचिराेली या जिल्ह्यामध्ये मात्र टंचाईची तीव्रता फारशी नसल्याने तेथे टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागलेला नाही.  मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड आणि नाशिक विभागांतील जळगाव जिल्ह्यात टंचाईची स्थिती गंभीर असल्याने तेथे सर्वाधिक टॅंकरने पाणी द्यावे लागत आहे. औरंगाबाद विभागात सर्वाधिक ७४९ गावे, १७० वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ९३६ टॅंकर सुरू आहेत. तर अमरावती विभागातील ३१५ गावांना ३१४ टॅंकर आणि नाशिक विभागातील ३०५ गावे आणि ३२६ वाड्या २५२ टॅंकरने, कोकण विभागातील २०८ गावे ५७० वाड्यांना १०३ टॅंकरने, पुणे विभागातील ८५ गावे, ३१९ वाड्यांना ७४ टॅंकरने तर नागपूर विभागातील ४३ गावांना ४२ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे पुरवठा विभागाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com