मागण्या पूर्ण होईपर्यंत हटणार नाही : शेट्टी

नाेटाबंदी, जीएसटीसारख्या निर्णयांमुळे शेतकरी अडचणीत आला असून, उत्पादन खर्च २५ टक्क्यांनी वाढला असताना, उत्पादन खर्च कमी कसा करणार, हा प्रश्‍न आहे. तर माेडका ताेडका हमीभावदेखील देऊ न शकणारे माेदी सरकार २०२२ मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न काय दुप्पट करणार? शेतकरी संवाद म्हणजे भंपकपणा आहे. - खासदारराजू शेट्टी
राजू शेट्टी
राजू शेट्टी

पुणे : उसाची थकीत देणी आणि दूधदरप्रश्‍नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २९ जून राेजी साखर आयुक्तालयावर माेर्चा काढणार असून, मागण्या पूर्ण हाेईपर्यंत हटणार नसल्याच्या इशारा खा. राजू शेट्टी यांनी बुधवारी (ता. २०) पत्रकार परिषदेमध्ये दिला.  या वेळी बाेलताना खा. शेट्टी म्हणाले, ‘‘खरीप ताेंडावर आला असताना, अद्याप उसाचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. उसाची सुमारे २ हजार काेटींची देणी कारखान्यांकडे थकीत असून, ऊस तुटल्यानंतर १४ व्या दिवशी पैसे देणे कायद्याने बंधनकारक असून, उशिर झाला तर विलंबाच्या अवधीच्या १५ टक्के व्याजदराने देणे बंधनकारक आहे. मात्र साखरेचे दर पडलेले असल्यामुळे आम्ही संयम बाळगला हाेता. आता साखरेचे दर ३० रुपयांपर्यंत स्थिर झाले असल्याने कारखान्यांना आता देणी देणे साेप आहे. ही देणी तातडीने द्यावीत, अन्यथा साखर आयुक्तांनी कारखान्यांची मालमत्ता जप्त करून, शेतकऱ्यांची देणी द्यावीत.’’ दूध प्रश्‍नाबाबत बाेलताना खा. शेट्टी म्हणाले, ‘‘दूध पावडरबाबत राज्य आणि केंद्राच्या नियाेजनाअभावी दुधाचे दर पडलेले आहेत. गाईच्या दुधाचा प्रति लिटरचा उत्पादन खर्च ३५ रुपये असताना, मात्र २० रुपयांनी खरेदी हाेत आहे. हा ताेटा किती दिवस सहन करायचा, असा प्रश्‍न आहे. दूधदरावर तातडीने उपाययाेजना म्हणून सरकारने २५ लाख टन दूध पावडरची खरेदी करून त्याचा बफर स्टॉक करावा व शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान थेट बॅंक खात्यावर जमा करावेत. हे अनुदान एक महिना देण्यात यावे व यासाठी ९०० काेटी रुपयांची तरतूद करावी, तसेच या प्रश्‍नावर धाेरणात्मक निर्णय घ्यावा.’’ ..तर ‘अमूल’ला परवानगी द्या अमूलने शेतकऱ्यांच्या पडत्या काळातही दूध खरेदी करावी. शेतकऱ्यांना कायस्वरूपी चांगले दर अमूलद्वारे मिळणार असतील, तर अमूलला राज्यात दूध खेरदीसाठी परवानगी देण्यास आमची हरकत नाही, असे खा. शेट्टी यांनी स्पष्ट केले. भाकड जनावरांचा प्रश्‍न युराेपियन राष्ट्रांमध्ये देखील दूधदराचा प्रश्‍न आहे. दुधाचे अतिरिक्त उत्पादन राेखून दर स्थिर ठेवण्यासाठी २८ टक्के गाई कत्तलखान्यात पाठविण्याचा धाेरणात्मक निर्णय सरकारने घेतला. मात्र आपल्या देशात गाेवंशबंदी असल्याने भाकड जनावरांच्या प्रश्‍न उभा राहिला आहे. यामुळे आपल्या अतिविद्वान राज्यकर्ते असा विचार करणे शक्य नाही, असेही खा. शेट्टी या वेळी म्हणाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com