बी. एस. येडियुरप्पा
बी. एस. येडियुरप्पा

येडियुरप्पांची आज अग्निपरिक्षा

नवी दिल्ली  : कर्नाटकात सत्ता स्थापन केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने भाजप सरकारला मोठा झटका दिला. कॉंग्रेसने कर्नाटकात सत्तास्थापनेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी (ता.१८) सुनावणी करताना न्यायालयाने भाजपला आज, शनिवारी (ता. १९) संध्याकाळी ४ वाजता बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत.  भाजप लगेच बहुमत चाचणीसाठी तयार नव्हते. बहुमत चाचणीसाठी आणखी वेळ दिला जावा, यासाठी भाजपतर्फे युक्तिवाद करण्यात आला. मात्र न्यायलयाने त्यास स्पष्ट नकार देत शनिवारीच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. गोपनीय पद्धतीने मतदान घेण्यात येऊ नये, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने या वेळी दिले. कर्नाटकात सत्तास्थापनेविरोधात काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. कर्नाटकमध्ये राज्यपालांनी बी. एस. येडियुरप्पांना सत्तेसाठी पाचारण केल्यामुळे बुधवारी (ता.१६) मध्यरात्री सर्वोच्च न्यायालय गाठलेल्या काँग्रेसच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांनी सुनावणी करत येडियुरप्पा यांचा शपथविधी न रोखण्याचा निर्णय दिला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी झाली. न्या. शरद बोबडे, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. के. सिकरी यांच्या खंडपीठापुढे कोर्ट नंबर ६ मध्ये ही सुनावणी झाली. काँग्रेसतर्फे अभिषेक मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश ऐतिहासिक असल्याचे ते म्हणाले. बहुमत सिद्ध होईपर्यंत मुख्यमंत्री येडियुरप्पा कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत, तसेच तोपर्यंत राज्यपाल अँग्लो इंडियन सदस्याची नेमणूकही करू शकत नाहीत, असा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला. राज्यपालांनी सवार्वांत मोठ्या पक्षाला निमंत्रण द्यावे की बहुमत असलेल्या आघाडीला यावरही येत्या काळात सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार असल्याचे श्री. सिंघवी यांनी                            सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com