ऊस ‘एफआरपी’त २०० रुपये वाढ

ऊस ‘एफआरपी’त  २०० रुपये वाढ
ऊस ‘एफआरपी’त २०० रुपये वाढ

नवी दिल्ली ः ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ‘एफआरपी’त प्रतिटन २०० रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता.१८) घेतला. आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या २०१८-१९ च्या गाळप हंगामासाठी शेतकऱ्यांना आता प्रतिटन २७५० रुपये एफआरपी मिळणार आहे.  ऊस उत्पादकांना साखर कारखान्यांनी द्यावयाच्या किमान दरात, एफआरपीत वाढ करण्याचा निर्णय कॅबिनेट कमिटी आॅन इकॉनॉक अफेअरने (सीसीइए) बुधवारी घेतला. अलीकडेच केंद्राने खरिपातील १४ पिकांच्या हमीभावात मोठी वाढ केली आहे. त्या वेळी केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने उसाच्या एफआरपीत २०० रुपये वाढ करून प्रतिक्विंटल २७५० रुपये दर देण्याची शिफारस केंद्राकडे केली होती. २०१७-१८ च्या हंगामात केंद्राने उसासाठी २५५० रुपये प्रतिटन एफआरपी जाहीर केली होती. सध्या १० टक्के उताऱ्याशी एफआरपी संलग्न करण्यात आली आहे. यापेक्षा जास्त उतारा आल्यास ०.१ टक्के वाढीमागे प्रतिक्विंटल २.६८ रुपये वाढ देण्यात येणार आहे.  एफआरपीत वाढ केल्याचा अधीक फायदा जे राज्य केंद्राच्या दरापेक्षा जास्त राज्य निर्धारित मूल्य (एसएपी) देतात अशा राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. देशातील महत्त्वाचे ऊस उत्पादक उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाना त्यांचे राज्य निर्धारित मूल्य जाहीर करतात. त्यांचे राज्यनिर्धारित मूल्य साधारणतः एफआरपीपेक्षा जास्त असते

जगात ब्राझीलनंतर साखर उत्पादनात भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. २०१७-१८ च्या विपणन वर्षात देशात ३२.२५ दशलक्ष टन साखर उत्पादन झाले होते. ‘इस्मा’ने अलीकडेच देशातील चांगल्या पावसामुळे ऊस उत्पादन वाढणार आहे. त्यामुळे २०१८-१९ च्या गाळप हंगामात साखर उत्पादनात १० टक्क्यांनी वाढून विक्रमी ३५.५ दशलक्ष टन उत्पादन होईल, अशी शक्यता वर्तविली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com