agrowon news in marathi,Vasantrao Naik Award announced, Maharashtra | Agrowon

किसनवीर कारखान्याला यंदाचा वसंतराव नाईक सामाईक पुरस्कार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 जून 2018

मुंबई : राज्यातील कृषिक्रांतीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने दिले जाणारे २०१८ या वर्षाचे पुरस्कार सोमवारी (ता. २६) जाहीर झाले. सातारा जिल्ह्यातील किसनवीर सहकारी साखर कारखान्याला यंदाचा वसंतराव नाईक सामाईक पुरस्कार जाहीर झाला, तर ‘अॅग्रोवन’मधील चकाट्या या सदराचे व्यंगचित्रकार लहू काळे यांना कृषी पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. 

मुंबई : राज्यातील कृषिक्रांतीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने दिले जाणारे २०१८ या वर्षाचे पुरस्कार सोमवारी (ता. २६) जाहीर झाले. सातारा जिल्ह्यातील किसनवीर सहकारी साखर कारखान्याला यंदाचा वसंतराव नाईक सामाईक पुरस्कार जाहीर झाला, तर ‘अॅग्रोवन’मधील चकाट्या या सदराचे व्यंगचित्रकार लहू काळे यांना कृषी पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. 

प्रतिष्ठानचे सचिव अॅड. विनयकुमार पटवर्धन, विश्वस्त मुश्ताक अंतुले आणि दीपक जयंतराव पाटील यांनी पुरस्कारांची घोषणा केली. येत्या १ जुलै रोजी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

वसंतराव नाईक कृषी पुरस्कार २०१८ चे मानकरी असे आहेत. 

 •  सामाईक पुरस्कार - किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना (भुईंज, ता. वाई, सातारा) अध्यक्ष मदन प्रतापराव भोसले.  
 • कृषी पुरस्कार - अरुण निंबाजी देवरे (मु. पो. दाभाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक)  
 • कृषी प्रक्रिया पुरस्कार - कु. नेहा दत्तात्रेय घावटे (मांजरी बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे)  
 • कृषी साहित्य पुरस्कार - डॉ. एस. जी. बोरकर (सहयोगी अधिष्ठाता, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)  
 • कृषी पत्रकारिता पुरस्कार - लहू काळे (उंड्री, पुणे)  
 • कृषी उत्पादन निर्यात पुरस्कार - प्रवीण रामनाथ संधान (माॅन्सून फूड्स, मु. चिंचखेड, ता. जि. नाशिक)  
 • फलोत्पादन पुरस्कार - धीरज एस जुंधारे (मु. हाटला, ता. काटोल, जि. नागपूर)  
 • भाजीपाला उत्पादन - श्रीमती राहिबाई पोपेरे (मु. कोंभाळणे, ता. अकोले, जि. अहमदनगर)  
 • फुलशेती - महेश रघुनाथ धुम (मु. गरदवाडी, ता. जव्हार, जि. पालघर)  
 • सामाजिक वनीकरण - अजित वर्तक (महाराष्ट्र वृक्ष संवर्धनी, शनिवार पेठ, पुणे)  
 • पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय - श्रीमती काशीबाई मोरे (ता. मुडशिंगी, ता. करवीर, जि. कोल्हापूर)  
 • जलसंधारण - मिलिंद तुकारामजी भगत (सद्भावना ग्रामीण विकास संस्था, वर्धा)  
 • पर्यावरण - संजय पाटील (बायफ, मित्र रिसर्च फाउंडेशन, वारजे, पुणे).

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...