नाशिकमध्ये बाप्पाची मिरवणूक चालली १२ तास

नाशिकमध्ये बाप्पाची मिरवणूक चालली १२ तास

नाशिक : विघनहर्ता गणरायाला निरोप देण्यासाठी सिंहस्थ नाशिक नगरीमध्ये मुख्य मिरवणूक 12 तास चालली. सेल्फी घेताना एकाचा, तर दुसऱ्याचा गणपती बाप्पा बुडवताना असे दोघांचे बुडून मृत्यू झाले. दंडे हनुमान मित्र मंडळ मिरवणुकीत हाणामारी झाली, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.  

नाशिक : विघनहर्ता गणरायाला निरोप देण्यासाठी सिंहस्थ नाशिक नगरीमध्ये मुख्य मिरवणूक 12 तास चालली. सेल्फी घेताना एकाचा, तर दुसऱ्याचा गणपती बाप्पा बुडवताना असे दोघांचे बुडून मृत्यू झाले. दंडे हनुमान मित्र मंडळ मिरवणुकीत हाणामारी झाली, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

गणेश राजाराम वराडे (वय 18, रा मुंगसरे) याचा विसर्जनावेळी आणि किशोर सोनार (वय 20) याचा सेल्फी घेताना बुडून मृत्यू झाला. दुपारी साडेबाराला वाकडी बारव इथून विसर्जन मुख्य मिरवणुकीला सुरवात झाली. साडेतीन पर्यंत 5 मंडळांनी भद्रकाली परिसर सोडला होता. मिरवणुकीत 18 मंडळांचा सहभाग होता. नाशिकच्या सांस्कृतिक जीवनात ढोल ने अनन्यसाधारण स्थान मिळविले आहे. त्याचे प्रतिबिंब मिरवणुकीवर पडले होते. नाशिक पोलीस, संत गाडगे महाराज पतसंस्था, दि फ्युचर फाउंडेशन, हिंदू खाटीक संघटना, माळी समाज सेवा परिषद, युनायटेड महिला मंच, शुक्ल यजुर्वेदीय माध्यदिन ब्राम्हण संस्था, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आदींनी मंडळांच्या स्वागतासाठी मंडप उभारले होते. दंडे हनुमान मंडळाने डीजे चा दणदणाट केल्याने तालावर थिरकण्यासाठी तरुणाई चा महापूर आल्यागत स्थिती तयार झाली होती, सोबत लेझर शो उत्साहात भर घालत होता नाशिक : विघनहर्ता गणरायाला निरोप देण्यासाठी सिंहस्थ नाशिक नगरीमध्ये मुख्य मिरवणूक 12 तास चालली. सेल्फी घेताना एकाचा, तर दुसऱ्याचा गणपती बाप्पा बुडवताना असे दोघांचे बुडून मृत्यू झाले. दंडे हनुमान मित्र मंडळ मिरवणुकीत हाणामारी झाली, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

गणेश राजाराम वराडे (वय 18, रा मुंगसरे) याचा विसर्जनावेळी आणि किशोर सोनार (वय 20) याचा सेल्फी घेताना बुडून मृत्यू झाला. दुपारी साडेबाराला वाकडी बारव इथून विसर्जन मुख्य मिरवणुकीला सुरवात झाली. साडेतीन पर्यंत 5 मंडळांनी भद्रकाली परिसर सोडला होता. मिरवणुकीत 18 मंडळांचा सहभाग होता. नाशिकच्या सांस्कृतिक जीवनात ढोल ने अनन्यसाधारण स्थान मिळविले आहे. त्याचे प्रतिबिंब मिरवणुकीवर पडले होते. नाशिक पोलीस, संत गाडगे महाराज पतसंस्था, दि फ्युचर फाउंडेशन, हिंदू खाटीक संघटना, माळी समाज सेवा परिषद, युनायटेड महिला मंच, शुक्ल यजुर्वेदीय माध्यदिन ब्राम्हण संस्था, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आदींनी मंडळांच्या स्वागतासाठी मंडप उभारले होते. दंडे हनुमान मंडळाने डीजे चा दणदणाट केल्याने तालावर थिरकण्यासाठी तरुणाई चा महापूर आल्यागत स्थिती तयार झाली होती, सोबत लेझर शो उत्साहात भर घालत होता

मानाच्या महापालिका गणरायाचे रात्री 10 वाजून 27 मिनिटांनी पहिले विसर्जन झाले. गौरी पटांगणवर विधीवत गोदावरी मध्ये विसर्जन केल्यावर मूर्ती दान देण्यात आली. त्यावेळी शेवटचे मंडळ गाडगे महाराज पुतळ्या पासून पुढे निघाले होते. हेच मंडळ रात्री पावणेबाराला मुंदडा मार्केट जवळ होते, मुंबई नाका युवक मित्र मंडळाने रात्री साडे अकराला चित्ररथ मेहेर सिग्नल वरून परत नेला. रात्री बाराला ध्वनिक्षेपक बंद केल्यावर चित्ररथ अहिल्यादेवी होळकर पुलावर थांबले. इथून परतीचा प्रवास सुरु झाला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com