banana murchant has froud with farmers buying in bananas | Agrowon

यावलमध्ये केळी खरेदीत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक
टीम अॅग्रोवन
रविवार, 29 जुलै 2018

यावल, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये व्यापारी वर्गाकडून केळी पिकासाठी जाहीर होणाऱ्या दरापेक्षा कमी किमतीत केळी कापून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात अाहे, अशी तक्रार संचालक अतुल पाटील यांनी बाजार समितीच्या सभापतींकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावल, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये व्यापारी वर्गाकडून केळी पिकासाठी जाहीर होणाऱ्या दरापेक्षा कमी किमतीत केळी कापून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात अाहे, अशी तक्रार संचालक अतुल पाटील यांनी बाजार समितीच्या सभापतींकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कमी भावाने केळी खरेदी होत असताना बाजार समितीचे व्यापाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने तालुक्‍यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. बाजार समितीकडून तालुक्‍यातील शेतकऱ्यांना दररोज जाहीर होणारे केळीचे बाजार भाव मॅसेजद्वारे पाठविले जातात. व्यापाऱ्यांकडून जाहीर भावाप्रमाणे केळी खरेदी करण्यात येते का? याची चौकशी करणे समितीची जबाबदारी आहे. मात्र समितीचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. केळी नाशवंत असल्याने याचा गैरफायदा व्यापारी वर्ग घेतात.

बाजार समितीने जाहीर बोर्डभावाप्रमाणे केळी खरेदीसाठी कडक धोरण राबवावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. शेतकरी हितासाठी असलेली बाजार समिती काय भूमिका घेते? याकडे तालुक्‍यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जळगाव बाजार समितीचेही दुर्लक्ष
जळगाव बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातही तापी व गिरणा नदीकाठालगत व्यापारी केळी खरेदीचे दर जाहीर दरांपेक्षा १०० ते १५० रुपयांनी कमी देतात. शेतकऱ्याने नकार दिला, तर अडवणूक केली जाते. व्यापाऱ्यांची लॉबी मिळून दर पाडते. जळगाव तालुक्‍यात लवकरच कांदेबाग केळीची कापणी सुरू होईल. या पार्श्‍वभूमीवर व्यापाऱ्यांच्या व्यवहारांकडे लक्ष ठेवले जावे, तपासणी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी पुढे येत आहे.

इतर ताज्या घडामोडी
पानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...
डॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....
दाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...
उपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...
आंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...
औरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
चुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...
ओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...
पुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे  : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर  : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे   ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...
नगरमध्ये मुगाचे क्षेत्र वाढतेय; पण...नगर  ः जिल्ह्यात खरिपात मुगाचे क्षेत्र...
सोलापूरातील अवघ्या ५० हजार शेतकऱ्यांना...सोलापूर  : कर्जमाफीची प्रक्रिया गेल्या काही...
डाळिंबाचा प्रतिकिलो दर २० ते २२ रुपयांवरसोलापूर ः राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
केरळला २० कोटींची मदत ः मुख्यमंत्री...मुंबई : केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या...
दूध भुकटी उद्योग संकटात ; शेतकऱ्यांना...सोलापूर : दूध व दुग्धजन्य पदार्थांची...
शेतकऱ्यांनो, संघटित होऊन संघर्ष करा :...आळेफाटा, जि. पुणे : ‘‘शेतकऱ्यांवर प्रत्येक...
पंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची...तिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि...
परभणीत फ्लॉवर प्रतिक्विंटल १००० ते १२००...परभणी  ः  येथील जुना मोंढा भागातील फळे-...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पाऊसपुणे  : जिल्ह्यात गुरुवारी (ता. १६) सर्वदूर...