बांगलादेश भारतातील कापसाचा मोठा खरेदीदार

कापूस उत्पादनात ३.७६ टक्क्यांनी वाढ ​देशात २०१६-१७ या वर्षातील कापूस उत्पादन ३४५ लाख गाठींवर पोचले अाहे. अाधीच्या वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन ३.७६ टक्क्यांनी अधिक अाहे. गेल्या वर्षी पीक क्षेत्रात घट झाली होती. मात्र, पीक चांगले अाले. यामुळे उत्पादनात वाढ झाली अाहे. २०१५-१६ मध्ये ३३२ लाख गाठी उत्पादन झाले होते. यंदाही (२०१७-१८) कापूस उत्पादन वाढण्याची शक्यता अाहे, असा अंदाज वस्त्रोद्योग अायुक्त कविता गुप्ता यांनी म्हटले अाहे.
बांगलादेश भारतातील कापसाचा मोठा खरेदीदार
बांगलादेश भारतातील कापसाचा मोठा खरेदीदार

पाकिस्तानकडून अायात कमी; चीनमध्ये १७ टक्के निर्यात

मुंबई : भारतातील कापसाला शेजारील देशांकडून मोठी मागणी अाहे. याअाधी पाकिस्तान हा भारतातील कापसाचा मोठा खरेदीदार होता. अाता त्याची जागा बांगलादेशने घेतली अाहे.

भारतातून होणाऱ्या एकूण कापूस निर्यातीपैकी एकट्या बांगलादेशने ४० टक्के कापूस खरेदी केला अाहे, अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग अायुक्त तसेच कापूस सल्लागार मंडळाच्या अध्यक्ष कविता गुप्ता यांनी दिली अाहे. कापूस सल्लागार मंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली अाहे. गेल्या मे महिन्यामर्यंत मिळालेल्या कापूस निर्यात अाकडेवारीनुसार, बांगलादेशमध्ये सर्वाधिक कापूस निर्यात झाला असल्याचे दिसून अाले अाहे. २०१५-१६ मध्ये पाकिस्तानने भारतातून होणाऱ्या एकूण निर्यातीतील ४० टक्के कापूस खरेदी केला होता. मात्र गेल्या वर्षभरात पाकिस्तानकडून कमी कापूस अायात करण्यात अाला अाहे. गेल्या मे महिन्यापर्यंत पाकिस्तानने भारतातून अायात केलेल्या कापसाचा वाटा केवळ १५.२९ टक्के अाहे, असे गुप्ता यांनी सांगितले. बांगलादेशनंतर चीन भारतातील कापसाचा दुसऱ्या क्रमाकांचा खरेदीदार ठरला अाहे. भारतातून चीनमध्ये १७ टक्के कापूस निर्यात करण्यात अाली अाहे. गेल्या वर्षी चीनमध्ये केवळ ९ टक्के कापूस निर्यात झाली होती. मात्र, २०१६-१७ मध्ये भारतातून होणाऱ्या एकूण कापूस निर्यातीत घट झाली अाहे. या वर्षात ६० लाख गाठी कापूस निर्यात झाली अाहे. याअाधीच्या वर्षी (२०१५-१६) ६९.०७ लाख गाठी कापूस निर्यात झाली होती. भारतात यंदा २.६ दशलक्ष गाठी (एक गाठ १७० किलो) कापूस अायातीचा अंदाज व्यक्त करण्यात अाला अाहे. गेल्या वर्षी २.३ दशलक्ष गाठी कापूस अायात झाली होती. मेपर्यंत देशात १.४ दशलक्ष गाठी कापूस अायात झाली अाहे, अशी माहिती गुप्ता यांनी दिली अाहे. कापूस उत्पादनात ३.७६ टक्क्यांनी वाढ देशात २०१६-१७ या वर्षातील कापूस उत्पादन ३४५ लाख गाठींवर पोचले अाहे. अाधीच्या वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन ३.७६ टक्क्यांनी अधिक अाहे. गेल्या वर्षी पीक क्षेत्रात घट झाली होती. मात्र, पीक चांगले अाले. यामुळे उत्पादनात वाढ झाली अाहे. २०१५-१६ मध्ये ३३२ लाख गाठी उत्पादन झाले होते. यंदाही (२०१७-१८) कापूस उत्पादन वाढण्याची शक्यता अाहे, असा अंदाज वस्त्रोद्योग अायुक्त कविता गुप्ता यांनी म्हटले अाहे. cotton 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com