| Agrowon

पुणे : ‘स्वामिनाथनः भूकमुक्तीचा ध्यास’ पुस्तक प्रकाशन

स्थळ: एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन सभागृह, नवी पेठ, पुणे पासून: 08/09/2017 पर्यंत : 08/09/2017 वेळ : 06:00pm - 06:00pm संकेत स्थळ : --

हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. स्वामिनाथन उद्या पुण्यात

पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने कृषी समस्यांची चर्चा

पुणे : देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या तोंडी सध्या चर्चेत असलेले स्वामिनाथन आयोगाचे प्रमुख डॉ. एम. एस. स्वामिनाथन उद्या (ता. ८) पुण्यामध्ये प्रथमच जाहीर कार्यक्रमात आपली मते व्यक्त करणार आहेत. अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेल्या ‘स्वामिनाथनः भूकमुक्तीचा ध्यास’ या पुस्तकाच्या तीसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्या निमित्ताने स्वामिनाथन यांची मते जाणून घेण्याची संधी मिळते आहे. पुण्यातील नवी पेठेत एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन सभागृहात सायंकाळी सहा वाजता स्वामिनाथन आपले विचार व्यक्त करतील. शेती शास्त्रज्ञ, अन्नधान्य धोरणांचे तज्ज्ञ डॉ. देवेंद्र शर्मा आणि शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय जावंधियादेखील या वेळी उपस्थित राहणार आहेत. हवामानातील बदल आणि सतत कोसळणारे बाजारभाव या मोठ्या समस्या शेतकऱ्यांसमोर उभ्या आहेत. दुसरीकडे स्वामिनाथन आयोगाने सुचविलेली उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याची शिफारस अजूनही दुर्लक्षित राहिलेली आहे. या पार्श्वभूमीवर स्वामिनाथन काय भूमिका मांडतात याकडे कृषी क्षेत्रातील अभ्यासकांचे लक्ष लागून आहे.
 

 

संपर्क व्यक्ती

साधना प्रकाशन (Mob. 020 24459635),