Chance of heavy rain scattered places | Agrowon

तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता
संदीप नवले
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

पुणे : राज्यातील काही ठिकाणी हवेचा दाब कमी होत आहे. आज, शनिवारी (ता. १९) विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. उद्या (ता. २०) कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.  

पुणे : राज्यातील काही ठिकाणी हवेचा दाब कमी होत आहे. आज, शनिवारी (ता. १९) विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. उद्या (ता. २०) कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.  

अरबी समुद्र व कोकणाच्या काही भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कोकण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस शुक्रवारी (ता. १८) पडला. मध्य महाराष्ट्रातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, पुणे, महाबळेश्वर, इगतपुरी आणि खान्देशातील जळगावच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. उर्वरित मध्य महाराष्ट्रातील नगर, सो्लापूर सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिकच्या अनेक भागात ढगाळ हवामान होते. तर काही ठिकाणी चांगलेच कडक ऊन पडले. मराठवाड्यातही ढगाळ वातावरण तर अधूनमधून ऊन पडत होते. त्यामुळे हवामानात दमटपणा वाढून कमाल तापमानात वाढ झाली होती. विदर्भातील अनेक भागात ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी कडक ऊन पडल्याचे चित्र होते.

येत्या सोमवारी (ता. २१) कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (ता. १८) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील खेडमध्ये ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कणकवलीमध्ये ३० मिलिमीटर तर उर्वरित काही भागात हलका पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील आजरा, गगनबावडा, राधानगरी येथे दहा मिलिमीटर पाऊस पडला. उर्वरित भागात ढगाळ हवामान होते. मराठवाड्यातील धारूर, लातूर, रेणापूर येथेही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. विदर्भातील आणगाव, इटापल्ली, गोरेगाव, नांदुरा, सालेकसा येथेही हलका पाऊस पडला. उर्वरित काही ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरी बरसत होत्या. काही भागात ढगाळ हवामान असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

शुक्रवारी (ता. १८) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस ः मिलिमीटरमध्ये  : कोकण ः खेड ४०, कणकवली ३०, दौडामार्ग, हर्णे, मंडणगड २०. मध्य महाराष्ट्र ः आजरा, गगनबावडा, राधानगरी १०. मराठवाडा ः धारूर, लातूर, रेणापूर १०. विदर्भ ः आमगाव, ईटापल्ली, गोरेगाव, नांदुरा, सालेकसा २०, बाभूळगाव, भामरागड, चार्मोशी, देवरी, गोंदिया, पनवी, साकोली, शिंदेवाही, तिरोरा, तुमसर १०. घाटमाथा ः अंबोणे ४०, कोयना (पोफळी) २०, लोणावळा (आँफीस), शिरगाव, वाणगाव, दावडी, कोयना, ताम्हिणी १०. 

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...