Create micro-planes to overcome the scarcity | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात टंचाई निवारणासाठी सूक्ष्म आराखडे तयार करा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

सोलापूर : जिल्ह्यात निर्माण झालेल्या टंचाईवर मात करण्यासाठी टंचाई निवारणासाठी करण्यात येणाऱ्या सर्व उपाय-योजनांचा सूक्ष्म आराखडा तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री विजय देशमुख यांनी अक्कलकोट येथे दिल्या.

सोलापूर : जिल्ह्यात निर्माण झालेल्या टंचाईवर मात करण्यासाठी टंचाई निवारणासाठी करण्यात येणाऱ्या सर्व उपाय-योजनांचा सूक्ष्म आराखडा तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री विजय देशमुख यांनी अक्कलकोट येथे दिल्या.

देशमुख यांनी सोमवारी (ता.१५) अक्कलकोट तालुक्‍यातील इंगळगी, जेऊर, नागणसूर, बोरोटी, उटगी गावातील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. त्यानंतर पंचायत समितीतील आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार सिद्धराम म्हेत्रे, नगराध्यक्षा शोभा खेडगी, पंचायत समिती सभापती सुरेखा काटगाव, उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अंजली मरोड, गटविकास अधिकारी महादेव कोळी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ‘‘यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. सर्व उपयायोजना करून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ऊभे राहील. टंचाई लक्षात घेऊन पाणी पुरवठ्याचे स्त्रोत आरक्षित करावे, त्यांच्या बळकटीकरणावर भर द्यावा. पिण्याचे पाणी, जनावरांना चारा या गोष्टींना प्राधान्य द्यावे. संबंधित अधिकाऱ्यांनी विशेषत: महसूल व कृषी विभागाने टंचाई परिस्थितीचा अहवाल तयार करून तो तातडीने शासनास पाठवावा, जेणेकरून जिल्ह्यात टंचाई परिस्थिती जाहीर होण्यास मदत होईल.``

पालकमंत्र्यांनी इंगळगी गावास भेट दिली. या वेळी गावास पिण्याच्या पाण्याचा टॅंकर मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. जेऊर येथील शेतकरी शरणप्पा गुरव यांच्या पिकाचीही त्यांनी पाहणी केली.

 जेऊर ग्रामस्थांशी संवाद साधताना पालकमंत्री म्हणाले, ‘‘या भागात पाण्याची समस्या गंभीर आहे. लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध केले जाईल. जेऊर गावचा पाणीपुरवठा योजनेसाठी प्रस्ताव द्यावा, त्यासाठी आवश्‍यक ती मदत केली जाईल.`` दरम्यान शेतकऱ्यांच्या पीकविम्याची रक्कम तातडीने देण्याबाबत संबंधित विभागाला त्यांनी सूचना दिल्या.

नागणसूर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री म्हणाले, ‘‘कमी पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप गेला व रब्बीची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी आणि जनावरांचा चाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. या भागात रोजगार हमीची कामे सुरू होतील. बोराटी येथील तलावातील गाळ नेण्यासाठी शेतकरी पुढे आल्यास तेथील गाळ काढण्यात येईल.

 

इतर बातम्या
जळगावात दीड हजारांवर शेततळ्यांची कामे...जळगाव ः जिल्ह्यात "मागेल त्याला शेततळे''...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ साधणार...अमरावती ः दुष्काळ, पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर...
दोन्ही शिंदेंना आत्मविश्वास नडला सोलापूर : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या...
नांदगाव तालुक्यात फळबागा वाचविण्यासाठी...नाशिक : नांदगाव तालुक्यातील फळबागा वाचविण्यासाठी...
सांगोला साखर कारखाना राज्य बँकेच्या...सोलापूर : सांगोला सहकारी साखर कारखाना राज्य...
‘कृष्णे’च्या पाणीपातळीत घटसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला पाणीपुरवठा...
अरुणाग्रस्तांचा गाव न सोडण्याचा निर्धारसिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पात पाणीसाठा केला, तरी...
बुलडाण्यात मागणी आल्यास तत्काळ टँकर...बुलडाणा  : जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट भीषण...
नांदेड : साडेतेरा हजार हेक्टरवर उन्हाळी...नांदेड : जिल्ह्यात २०१९ च्या उन्हाळी हंगामात १३...
वऱ्हाडात विद्यमान खासदारांनाच पुन्हा...अकोला ः लोकसभा निवडणुकीच्या निकालात गुरुवारी (ता....
पुणे जिल्ह्यातील चौदा कारखान्यांकडे...पुणे   ः जिल्ह्यात गळीत हंगाम संपवून...
नाशिकला हेमंत गोडसे रिपीट, तर डॉ. भारती...नाशिक : नाशिक जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी लोकसभा...
जळगावात कांदा विक्रीत शेतकऱ्यांची लूटजळगाव ः कांद्याचे दर दबावात असतानाच त्याची विपणन...
जळगावात किसान सन्मान निधीचे वितरण...जळगाव ः खानदेशात सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांना...
पुणे जिल्ह्यात फळबाग लागवडीसाठी एक...पुणे  ः यंदा खरीप हंगामात फळबाग लागवड करू...
निविष्ठांची तस्करी रोखण्यासाठी...यवतमाळ ः गेल्या वर्षीच्या अनुभवातून बोध घेत...
नगर, शिर्डीत ‘काँटे की टक्कर’ मतात...नगर ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कामावर...
अकरापैकी सहा आमदारांचा लोकसभेत प्रवेशमुंबई ः सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात...
पुण्यातील पाणी, वाहतुकीचे प्रश्न...पुणे  ः येत्या पाच वर्षांत पुण्याचा...
निवडणुका घेतल्या नसत्या तरी चालले असते...सातारा  ः देशात नरेंद्र मोदी यांच्या...