परभणीत काकडी प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये

काकडी
काकडी

परभणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.३) काकडीची २० क्विंटल आवक होती. काकडीला १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. वांग्याची २० क्विंटल आवक होती, त्यास २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. टोमॅटोची ४५० क्विंटल आवक होती, त्यास २००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. हिरव्या मिरचीची ३० क्विंटल आवक होती, तीस २००० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ६ क्विंटल आवक होती, त्यास ३००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. पालकची १५ क्विंटल आवक होती, तीस ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक होती, त्यास १२०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. शेफूची १० क्विंटल आवक होती, शेफूला १२०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. मेथीच्या २० हजार जुड्यांची आवक होती मेथीला प्रतिशेकडा ३०० ते ६०० रुपये दर मिळाले. करडईच्या भाजीची ७ क्विंटल आवक होती, तीस १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. कोथिंबिरची ३५ क्विंटल आवक होती, तीस ४००० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. फ्लाॅवरची १५ क्विंटल आवक होती, त्यास ३००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. बाजार समितीतील शेतमालाची आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)

शेतमाल     आवक     किमान     कमाल
कोबी     ३०     १२००     २०००
दुधी भोपळा   १०     ८००     १५००
भेंडी     १५     १२००     २०००
गवार     १०     २५००     ३५००
दोडका     ८     ४०००     ५०००
कारला     ६     २५००     ३५००
पातीच्या कांदा ७     १५००     २०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com