Drip irrigation at 1 25 thousand lakh acres in Sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्यात सव्वा लाख एकरांवर ठिबक सिंचन
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

सांगली : जिल्ह्यात ठिबक आणि तुषार सिंचन करण्यासाठी शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. गेल्या आठ वर्षांत ठिबक सिंचनाचे ४९ हजार ४९६ हेक्‍टर तर, तुषार सिंचन २ हजार ११५ हेक्‍टर असे एकूण ५१ हजार ६११ हेक्‍टर म्हणजे एक लाख २९ हजार २७ एकर क्षेत्र ठिबक व तुषार सिंचनाखाली आली आहे.

सांगली : जिल्ह्यात ठिबक आणि तुषार सिंचन करण्यासाठी शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. गेल्या आठ वर्षांत ठिबक सिंचनाचे ४९ हजार ४९६ हेक्‍टर तर, तुषार सिंचन २ हजार ११५ हेक्‍टर असे एकूण ५१ हजार ६११ हेक्‍टर म्हणजे एक लाख २९ हजार २७ एकर क्षेत्र ठिबक व तुषार सिंचनाखाली आली आहे.

२०१७-१८ मध्ये ३ हजार १०० शेतकऱ्यांनी १६७० हेक्‍टरवर ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतला आहे. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यात एकतीशसे शेतकऱ्यांना सुमारे सात कोटींचे अनुदान मिळाले आहे. जास्तीत-जास्त क्षेत्र सिंचनाखाली यावे यासाठी ठिबक आणि तुषार सिंचनाला शासन प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी ४५ ते ५५ टक्केपर्यंत अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. त्यात ऊस आणि द्राक्षांचे सर्वाधिक क्षेत्र आहे.

दुसऱ्या बाजूला जिल्ह्याच्या पूर्वभागात द्राक्षे आणि डाळिंब बागायतदारांनी कमी पाण्यात पीक येण्यासाठी ठिबक सिंचनचा मार्ग स्वीकारला. गेल्या काही वर्षांत सिंचनाखाली क्षेत्र जास्तीत- जास्त आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. साखर कारखान्यांची संख्या वाढल्यानंतर उसाचे क्षेत्र वाढण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. सुरवातीस उपसा सिंचन योजना सुरू झाल्या. मात्र अतिरिक्त पाणी वापरामुळे क्षारपड जमिनीची समस्या गंभीर झाली. त्यामुळे आता पाणी बचतीसाठी व जमीन वाचवण्यासाठी बहुसंख्य कारखाने ठिबकसाठी प्रोत्साहन देत आहेत.

जिल्ह्याच्या पूर्व भागात ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ योजनांचे पाणी गेले आहे. मात्र ते  बारमाही मिळेल, याची खात्री शेतकऱ्यांना नाही. त्यामुळे तलावात, शेततळ्यात पाणी साठवले जाते. हे पाणी अनेक शेतकरी ठिबक पद्धतीने पिकांना देत आहेत. पूर्व भागात द्राक्षे, डाळिंब आणि भाजीपाला पिकांसाठी ठिबकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो आहे.

जिल्ह्यात आता उसासाठीचे ठिबकचा वापर वाढत आहे. आतापर्यंत या पिकाखाली ठिबकचे क्षेत्र ४० हजार एकरावर गेले आहे.

इतर ताज्या घडामोडी
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...
नाशिकला स्वाईन फ्ल्यूचा कहर, 24...नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने...
आज मराठवाडा मुक्तीदिन ! संग्रामाला झाली...15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला...
पेट्रोल दराची शंभरीकडे वाटचाल मुंबई : महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या...
वऱ्हाडात पिकांना वाढती उष्णता सोसवेनाअकोला  ः गेल्या अाठ दिवसांपासून कमाल...
शेतीमाल प्रक्रियेला चालना देण्यासाठी...भेंडा, जि. नगर  : बीव्हीजी ग्रुपने स्वच्छता...
साताऱ्यात ११७७ शेततळ्यांची कामे पूर्णसातारा  ः मागेल त्याला शेततळे योजनेतून...
इंधन दरवाढ शेतकऱ्यांच्या मुळावरऔरंगाबाद : इंधन दरवाढीचा थेट आघात आता शेतीवरही...
शेतमाल वाहतुकीच्या दरात वाढजळगाव : इंधनाचे दर दिवसागणिक वाढत आहेत. डिझेलचे...