देशात हळद उत्पादन घटण्याचा अंदाज

‘‘यंदा हळदीच्या पिकाची पुरेशी वाढ झालेली नाही. उत्पादनात घट झाल्यास दरात तेजी राहिल. यंदा साधारण ५५०० ते ११००० रुपये दर आहे. तो १५ हजार रुपयांपर्यंत जाईल. हळद उत्पादन वाढीसाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या पावसाची सरासरी दरवर्षी पाहिली जाते. निम्मा ऑगस्ट महिना पाऊस झालाच नाही. देशात शिल्लक असलेल्या हळदीला डिसेंबर महिन्यात तेजी येण्याची शक्‍यता आहे.’’
देशात हळद उत्पादन घटण्याचा अंदाज
देशात हळद उत्पादन घटण्याचा अंदाज

पीकवाढीच्या काळात पावसाच्या ओढीचा फटका; बाजारात दर वाढण्याचे संकेत

सांगली : हळद उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात यंदा पावसाला उशिरा सुरवात झाली तसेच वाढीच्या काळात पावासाने ओढ दिल्याने पिकाला फटका बसला. त्यामुळे देशातील हळद उत्पादन जवळपास ११ टक्‍क्‍यांनी घटण्याची शक्‍यता आहे. या दोन राज्यांतील उत्पादनात ७ लाख पोत्यापर्यंत (एक पोते = ६० किलो) ४२ हजार टनांपर्यंत घट होईल, असा अंदाज हळद उद्योगातून व्यक्त होत आहे.

देशामध्ये तमिळनाडू, आंध्र प्रदेश ही राज्य हळद उत्पादनात अग्रेसर आहेत. देशाच्या एकूण उत्पादनापैकी या राज्याचा वाटा तब्बल ४० टक्के आहे. देशात दरवर्षी हळदीचे सरासरी ७५ लाख पोत्यांचे म्हणजेच ४ लाख ५० हजार टन उत्पादन होते. मात्र पावसाच्या तुटीने उत्पादनात घट होऊन यंदाच्या हंगामात हळदीचे उत्पादन अंदाजे ६७ लाख पोते म्हणजेच ४ लाख २ हजार टन होईल असा अंदाज आहे. तमिळनाडूमध्ये दरवर्षी हळदीचे सुमारे १२ ते १६ लाख पोत्यांचे उत्पादन होते. यंदा तमिळनाडूमध्ये सुमारे ३० टक्‍क्‍यांनी लागवड घटली आहे. यामुळे गेल्यावर्षीपेक्षा यंदा ५ लाख हळदीची पोत्यांचे उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. अशी माहिती हळदीचे व्यापारी मनोहर सारडा यांनी दिली. हळद उद्योगातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘यंदा हळदीच्या पिकाची पुरेशी वाढ झालेली नाही. उत्पादनात घट झाल्यास दरात तेजी राहिल. यंदा साधारण ५५०० ते ११००० रुपये दर आहे. तो १५ हजार रुपयांपर्यंत जाईल. हळद उत्पादन वाढीसाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या पावसाची सरासरी दरवर्षी पाहिली जाते. निम्मा ऑगस्ट महिना पाऊस झालाच नाही. देशात शिल्लक असलेल्या हळदीला डिसेंबर महिन्यात तेजी येण्याची शक्‍यता आहे.’’

उशिरा पावसाने हळदीची लागवड उशिरा झाली. पण याचा परिणाम राज्यातील हळदीच्या क्षेत्रात फारसे कमी झाले नाही. पण पावसाची कमतरता असल्याने हळदीचा अपेक्षित फुटवा फुटलेला नाही. यामुळे उत्पादन घट होणार आहे.  - डॉ. जितेंद्र कदम, सहयोगी प्राध्यापक,  पदवीत्तर संस्था, रोहा, जि. रायगड

गेल्या वर्षीपेक्षा यंदा हळदीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे दर वाढून येत्या हंगामात  प्रति क्विंटल १२ ते १३ हजार रुपये पर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. - मनोहर सारडा, हळद व्यापारी, सांगली

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात हळदीच्या लागवडीवर परिणाम झालेला नाही. तमिळनाडू आणि तेलंगणामध्ये कमी पाऊस असल्याने हळदीच्या लागवडीवर झाला झाला आहे.  - प्रकाश पाटील, सचिव,  सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com