गणरायाचे आज आगमन...

श्री गणेशाच्या आगमनाने राज्यातील खेड्यापांसून शहरांमध्ये घराघरात मंगलमय वातावरण फुलून निघणार आहे. नाेकरीनिमित्त विविध शहरांमध्ये विखुरलेला चाकरमानी आपापल्या गावांमध्ये दाखल झाला असून, गणेशाच्या स्वागतासाठी आतूर झाला आहे.
आज होणार गणरायाचे आगमन
आज होणार गणरायाचे आगमन

पुणे : मांगल्याचे प्रतीक असलेल्या गणेशाेत्सवाला आज (शुक्रवारी, ता. २५) उत्साहात प्रारंभ हाेत आहे. यानिमित्ताने बाजारपेठा फुलल्या असून, घरगुती आणि सार्वजनिक गणेशाेत्सवासाठी घराघरात लगबग सुरू आहे. श्री गणेशाच्या आगमनाने राज्यातील खेड्यापांसून शहरांमध्ये घराघरात मंगलमय वातावरण फुलून निघणार आहे. नाेकरीनिमित्त विविध शहरांमध्ये विखुरलेला चाकरमानी आपापल्या गावांमध्ये दाखल झाला असून, गणेशाच्या स्वागतासाठी आतूर झाला आहे. गणेशाेत्सवासाठी शहरांबराेबर गावांमधील बाजारपेठा फुलल्या आहेत. बाजार पेठांमध्ये पूजेचे साहित्य, फुले, सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली हाेती. सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांची धामधूम असणार असून, पहिल्या दिवसापासून देखावे खुले करण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत, तर घरगुती गणेशाेत्सवासाठी घरातील सजावटीसाठी आबालवृद्धांची लगबग सुरू आहे. शुक्रवारी (ता. २५) गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर मंगळवारी (ता. २९) गाैरींचे आगमन हाेणार आहे. गणेशाच्या स्वागतासाठी शहरांमध्ये विविध ढाेलपथके तयार झाली असून, आगमनासाठी आतूर झाली आहेत. पुणे शहरातील वैभवशाली गणेशाेत्सवाचे शतकाेत्तर राैप्यमहाेत्सवी वर्ष असल्याने विविध कार्यक्रमांचे आयाेजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. विविध मंडळांच्या वतीने गणेशाच्या आगमनाच्या मिरवणुकीसाठी पालख्या आणि रथ सज्ज केले आहेत.

देशातील पहिल्या सार्वजनिक गणेशाेत्सवाचा प्रारंभ झालेल्या भाऊ रंगारी मंडळाच्या श्रींची प्रतिष्ठापना महापालिकेचे विराेधी पक्षनेते चेतन तुपे यांच्या हस्ते सकाळी साडेअकरा वाजता हाेणार असून, पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी ११ वाजून ५६ मिनिटांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते हाेणार आहे. मानाच्या दुसऱ्या तांबडी जाेगेश्‍वरी गणेशाची प्रतिष्ठापना व्यावसायिक समीर शाह यांच्या हस्ते दुपारी एक वाजून १५ मिनिटांनी होईल, तर मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळाच्या श्रींची प्रतिष्ठापना दुपारी बारा वाजून ४५ मिनिटांनी मंडळाचे खजिनदार अंजली व सुखेन शहा यांच्या हस्ते होईल. चाैथ्या तुळशीबाग मंडळाच्या श्रींची प्रतिष्ठापना दुपारी साडेबारा वाजता डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते होईल. मानाच्या पाचव्या केसरीवाडा मंडळाच्या श्रींची प्रतिष्ठापना सकाळी साडेदहा वाजता डॉ. दीपक टिळक व रोहित टिळक यांच्या हस्ते हाेणार आहे, तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाच्या श्रींची प्रतिष्ठापना त्र्यंबकेश्‍वरचे गणेशनाथ महाराज यांच्या हस्ते सकाळी १० वाजून ९ मिनिटांनी हाेणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com