Heavy Rain in Marathawada | Agrowon

मराठवाड्यात पावसाची खांदेमळणी
संदीप नवले
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

कमी दाबाचे क्षेत्र निवळू लागले
राज्यातील काही भागात असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळत असून पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होणार आहे. आज (ता. २१)  उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी जोरदार, तर दक्षिण कोकण व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या (ता. २२) कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला. 

  • राज्यात सर्वदूर हजेरी
  • विदर्भात बरसल्या जोरदार सरी
  • मध्य, पश्चिम महाराष्ट्रात दमदार 
  • या नद्यांना आला पूर : बिंदुसरा (जि. बीड), कासी (बोधेगाव, जि. नगर), तेरणा (जि. लातूर)
  • या धरणांतून विसर्ग : चासकमान (जि. पुणे), गंगापूर (जि. नाशिक)
  •  मनोर मंडळात (जि. पालघर) २२८ मिलिमीटर पाऊस 
  •  मुदखेड (जि. नांदेड) १९९ मिलिमीटर पाऊस

पुणे : महिनाभरापासून प्रतीक्षा करावयास लावणाऱ्या पावसाने राज्यभरात दमदार पुनरागमन केले आहे. एेन पावसाळ्यात अपुऱ्या पावसाने कोलमडलेल्या मराठवाड्यावर वरुणराजाने विशेष कृपा केली आहे. येथील सर्व जिल्ह्यांत शनिवार (ता. १९) आणि रविवार (ता. २०) दमदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी खरीप हंगाम जरी हातचा गेला असला, तरी या पावसामुळे निदान आगामी पिके आणि जनावरांच्या पिण्यासाठी पाण्याची सोय होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आज (सोमवार, ता. २१) बैलपोळा साजरा होत असताना वरुणराजाने रविवारी (ता. २०) खांदेमळणी केल्यामुळे नद्या, नाले, ओढे लागले वाहू लागले आहेत. दरम्यान, परभणी जिल्ह्यात पुरात वाहून गेल्यामुळे दोन बहिणी, तर अंगावर भिंत कोसळल्याने एक महिला मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे.   

राज्यातील अनेक भागांत पावसाने रविवारी (ता. २०) जोरदार हजेरी लावली. कोकणातील पालघरमधील मनोर मंडळात सर्वाधिक २२८ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र नगरमधील बोधेगाव पारनेर, माही, नायगाव, पुणे जिल्ह्यांतील राजूर या मंडळातही धुवाधार पाऊस पडला. उर्वरित मंडळातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मराठवाड्यातील नांदेडमधील धर्माबाद मंडळात १८२ मिलिमीटर, तर विदर्भात हिंगोली जिल्ह्यातील माहिहिवरा मंडळात जोरदार सरी बरसल्या असून नद्या, नाले, ओढे भरून वाहू लागले. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. राज्यातील बहुतांशी भागात अखेरची घटका मोजत असलेल्या पिकांनाही जोरदार पावसामुळे दिलासा मिळाला आहे. 

बंगालच्या उपसागरात दोन ते तीन दिवसांपूर्वी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. हे क्षेत्र सध्या अरबी समुद्राच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे पावसाने रविवारी गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांशी ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकणातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात तुळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर जिल्ह्यांतील अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून ओढे, नाले भरून वाहत आहे. तसेच ताम्हिणी, लोणावळा, भिरा, वळवण या घाटमाथ्यावरही हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत होत्या. 

मध्य, पश्चिम महाराष्ट्रात पिकांना लाभदायक
मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील राजूर मंडळात सर्वाधिक पाऊस पडला. उर्वरित मंडलात ७० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडला.  नाशिक जिल्ह्यातही अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. नगर जिल्ह्यातील पारनेर, माही, जामखेड, अरणगाव, खर्डा, नायगाव, बोधेगाव या मंडलांत मुसळधार पाऊस पडला. उर्वरित मंडळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांच्या अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर खानदेशातील धुळे जिल्ह्याच्या काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. नंदुरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला असून, अनेक भागांत ढगाळ हवामान होते. जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे कापूस, तूर, मूग उडीद, बाजरी पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून काही ठिकाणी ओढे, नाले भरून वाहत होते. 

मराठवाड्याला मिळाला दिलासा
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यात शनिवारी (ता. १९) रात्री औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला असून पिकांना दिलासा मिळाला आहे. औरंगाबादमधील अजिंठा, आमथाना, बीडमधील, पाली, पिंपळनेर, पेढगाव, मांजरसुबा, चौसाळा, नेकनूर, लिंबगणेश, पाटोदा, दासखेड, थेरर्ला, अंमळनेर, आष्टी, गेवराई, जातेगाव, धोडराई, उमापूर, अंबाजाेगाई, लोखंडी, घाटनांदूर, बर्दापूर, हनुमंत, परळी, शिरूर, रायमोह, तिन्तरवानी येथे ७० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. उर्वरित भागात ७० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला. लातूरमझील बाभळगाव, तांदुळजा, चिंचोली, पाचिनचोली, नितूर, मांडनसुरी, चाकूर, नळेगाव, वडवळ, शेलगाव, झारी, साकोळ, हिसामबाद, जळकोट, घोनासी येथेही मुसळधार पाऊस झाला. तर उर्वरित भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. उस्मानाबादमधील  उस्मानाबाद शहर, उस्मानाबाद रूरल, बेंबळी, पाडोळी, केशेगाव, ढोकी, जागजी, थेर, सालगारा, मानकेश्वर, भूम, लेट, कळंब, नारंगवाडी, वाशीमध्येही जोरदार पाऊस झाला. उर्वरित भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. नांदेडमधील कुरुला, बारूळ, लोहा, धर्माबाद, अर्धापूर येथेही जोरदार पाऊस झाला असून, अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. ओढे, नाले व नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. जालना आणि नांदेडच्या काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून काही भागात ढगाळ हवामान होते. 

विदर्भात जोरदार 
विदर्भातील अनेक भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. परभणीतील लिंबाळा येथे सर्वाधिक ८० मिलिमीटर पाऊस पडला असून पूर्णा, ताडकळस, लिमाळा, चौदावा मंडळातही जोरदार पाऊस पडला. उर्वरित भागातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. हिंगोलीतील बासंबा येथे सर्वाधिक ९७ मिलिमीटर पाऊस पडला. तर सिरसम, माहिहिवरा, हयातनगर या मंडलातही जोरदार पाऊस पडला असून, उर्वरित मंडळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. वाशीममधील रिठाड मंडलात ७० मिलिमीटर पाऊस पडला. उर्वरित मंडळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. नागपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती जिल्ह्यांतील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.   

मराठवाड्यात १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेली ठिकाणे
लातूर ः बाभळगाव ११०,  पाचिनचोली १४६, नितूर १४५, चाकूर ११२, नळेगाव १५१, वडवळ १३१, शेलगाव ११४, झारी १०४, साकोळ १०५, हिसामबाद ११७, जळकोट १०२
नांदेड ः अर्धापूर १३०
उस्मानाबाद ः  शहर १३३, ग्रामीण १०८ 
बीड ः पाटोदा ११०
औरंगाबाद ः आमथाना १०५

दोघी बहिणी वाहून गेल्या
रविवारी (ता. २०) सकाळी साडेसात वाजता पारवा (ता. पालम) येथील आम्रपाली भगवान येवले (वय १२) आणि कीर्ती भगवान येवले (वय १९) या दोघी बहिणी दूध आणण्यासाठी पूल ओलांडून गेल्या, त्या परत येत असताना पुलावरील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. दुसऱ्या घटनेत शनिवारी (ता. १९) रात्री झालेल्या पावसात धानोरा काळे येथील घरामध्ये झोपलेल्या प्रभावती चंद्रकांत गायकवाड (वय ५८) या अंगावर भिंत कोसळल्यामुळे मृत्युमुखी पडल्या. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील बरबडा येथील दूध आण्यासाठी शेतामध्ये गेलेले १० ते १५ शेतकरी ओढ्याला आलेल्या पुरामुळे दुपारपर्यंत शेतामध्ये अडकून पडले होते. 

राज्यातील ७० मिलिमीटरपेक्षा अधिक झालेला मंडळनिहाय पाऊस ः मिलिमीटरमध्ये 
ठाणे ः बाळकुम ७८, ढोलखांब ७१,
रायगड  ः करनाळा ९७.१, नेरळ ७८, जसाई ७०, पेण १३०, हमरापूर १६९, वाशी ११२, कामरळी १२६, कोलाद ७८, पोलादपूर ११२, कोन्डवी ७७, वाकन ८५,  
रत्नागिरी ः रामपूर ८०, सावर्डे ७८,  शिरगाव १२९, 
पालघर ः  वाडा ८८, कडुस ७३, कोने ७१, कांचड १३३, साईवन १०८.४, कासा १३६, मनोर २२८, भोईसर १९१, सफाला ७७.३, आगरवाडी ७५.२, तारापूर १६५.४, जव्हार ७५, खोढाळा ८५.८, विक्रमगड ९८,  
नगर ः पारनेर ८२, माही १०४, जामखेड ८७, अरणगाव ८३.२, खर्डा ११४, नायगाव ९२, बोधेगाव १६०, 
पुणे ः राजुर ७०,  
औरंगाबाद ः अजिंठा ७६, आमथाना १०५, 
बीड ः बीड ९७, पाली ९४, पिंपळनेर ७४, पेढगाव ७८, मांजरसुबा ७४, चौसाळा १००, नेकनूर ७०, लिंबगणेश ८४, पाटोदा ११०, दासखेड १०२, थेरर्ला ९८, अंमळनेर ८०, आष्टी ७५, गेवराई ९७, जातेगाव ८४, धोडराई ८२, उमापूर ९५, अंबाजाेगाई ७३, लोखंडी ७६, घाटनांदुर ९०, बर्दापूर ९६, हनुमंत ७६, परळी ९२,  शिरूर ८३, रायमोह ७६, तिन्तरवानी ८७ 
लातूर ः बाभळगाव ११०, तांदुळजा ७७, चिंचोली ७४, पाचिनचोली १४६, नितूर १४५, मांडनसुरी ७६, चाकूर ११२, नळेगाव १५१, वडवळ १३१, शेलगाव ११४, झारी १०४, साकोळ १०५, हिसामबाद ११७, जळकोट १०२, घोनासी ७७ 
उस्मानाबाद ः उस्मानाबाद शहर १३३, उस्मानाबाद ग्रामीण १०८, बेंबळी ७५, पाडोळी १२०, केशेगाव ८०, ढोकी ९२, जागजी ८८, थेर १०२, सालगारा ८१, मानकेश्वर ८०, भूम १०५, लेट १०१, कळंब ७५, नारंगवाडी ८७, वाशी ९० 
नांदेड ः कुरुला ७५, बारूळ १२०, लोहा ८१, धर्माबाद १८२, अर्धापूर १३०, 
परभणी ः पूर्णा ७८, ताडकळस ७३, लिमाळा ८०, चौदावा ७७
हिंगोली ः बासंबा ९७, सिरसम ८१, माहिहिवरा ८५, हयातनगर ७३ 
वाशीम ः रिठाड ७०

 

 

इतर अॅग्रो विशेष
उपाय आहेत, इच्छाशक्ती हवी ! पुणे : राज्यात दुधाच्या गडगडलेल्या दरामुळे...
किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी...आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध उत्पादनात अग्रेसर...
शालेय पोषण आहार, अंगणवाडीत दूध पुरवा :...राज्यात सध्या दूध दराचा प्रश्‍न चव्हाट्यावर आहे....
दूधधंदा मोडून पडल्यास शेतीतील समस्या...शेतकऱ्यांना वस्तुस्थिती न सांगता त्यांच्या...
दूधदर प्रश्‍नी हवी ठोस उपाययोजना : संघदूध भुकटीला मागणीला नसल्याने अतिरिक्त दूध बाजारात...
दूधकोंडी फोडण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी...दूध उत्पादक शेतकरी दर मिळत नसल्याने अडचणीत आले...
उत्पादकता, गुणवत्ता सुधारणे आवश्‍यकपुणे : भारत दूध उत्पादनात जगात आघाडीवर असला तरी...
दूध उत्पादकांना २८ रुपये दर देणे शक्य...सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा लिटरमागे दररोज...
दूध भुकटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी...देशात दुधाचा ओघ वाढ आहे. इतरवेळी जेवढी मागणी...
दुग्ध व्यवसाय टिकण्यासाठी शाश्वत दर...पुणे ः महत्त्वाचा शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध...
दूध पावडर उत्पादनाबाबत सरकार गाफीलपुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे...
राज्यात ३० लाख लिटर दूध अतिरिक्तमंचर, जि. पुणे : राज्यात दररोज दोन कोटी वीस लाख...
राज्यात बुधवारपर्यंत कोरडे हवामानपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार होत असून, मध्य...
शक्तिपरीक्षेआधीच येडियुरप्पांची माघार नवी दिल्ली : बी. एस. येडियुरप्पा यांनी बहुमाताचा...
दूध उत्पादकांसाठी ९५:५ फॉर्म्यूला करावा...वाढलेले पशुखाद्याचे दर आणि वैरणीची अडचण अशा...
दूध दराच्या प्रश्नावर संघर्षाचा बिगुललाखगंगा, जि. औरंगाबाद : फुकट दूधवाटप केल्यानंतर...
येडियुरप्पांची आज अग्निपरिक्षानवी दिल्ली  : कर्नाटकात सत्ता स्थापन...
पिकांच्या अवशेषांपासूनही बनणार इथेनॉलनवी दिल्ली ः देशात मोठ्या प्रमाणात होणारी...
निवृत्त शिक्षक झाला प्रयोगशील शेतीतील...वडगाव निंबाळकर (ता. बारामती, जि. पुणे) येथील...
मॉन्सूननिर्मितीसाठी पोषक वातावरणपुणे : समुद्राच्या पृष्ठभागाच्या वाढलेल्या...