agriculture story in marathi, agrowon sarpanch mahaparishad, alandi, pune | Agrowon

अॅग्रोवन सरपंच महापरिषद २०१८ क्षणचित्रे

रविवार, 25 नोव्हेंबर 2018

अॅग्रोवन सरपंच महापरिषद २०१८ क्षणचित्रे

‘कृषिकेंद्रित ग्रामविकासासाठी सरपंचांसाठी सुरू करण्यात आलेले देशातील पहिले व्यासपीठ’ अशी ख्याती मिळवणाऱ्या ‘सकाळ अॅग्रोवन’च्या आठव्या सरपंच महापरिषदेला शनिवारी (ता.२४) श्री क्षेत्र आळंदीत शनिवारी अमाप उत्साहात सुरवात झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सरपंचांनी पहिल्याच दिवशी बारकाईने नोंदी घेत ग्रामविकासाची शिदोरी गोळा केली. 

अवघ्या ग्रामीण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या आळंदी येथील या ग्राममंथनात उच्चशिक्षित, युवा सरपंच सहभागी झाले. विशेष म्हणजे गावच्या आदर्श कारभारीण असलेल्या महिला सरपंच वही-पेन, डायरी या सामग्रीसह सकाळपासून ग्रामविकासाच्या नोंदी टिपत होत्या. आपल्या गावशिवारातील दुष्काळाचे मळभ दूर करण्यासाठी दिशादर्शक माहितीसाठी शुक्रवारी (ता. २३) मध्यरात्री आळंदीत सरपंच दाखल होत होते. त्यानंतर पुन्हा पहाटेपासून सरपंचांची रीघ लागली. सरपंचांच्या स्वागतासाठी आळदींच्या चारही दिशांना मोठे ‘फ्लेक्स’ लावण्यात आले होते. प्रशस्त वाहनतळ, निवासाची सुविधा असल्याने सरपंच आनंदाने आळंदीत दाखल होत माउलीचे दर्शन घेत परिषदेच्या स्थळी दाखल होताना दिसत होते. मुख्यमंत्री या ग्राममंथनात सहभागी होत असल्याने कडक बंदोबस्त आळंदीत होता.