Loanwaiver scheme again meets the norms | Agrowon

कर्जमाफी योजनेला पुन्हा निकषांचा अडसर
गोपाल हागे
रविवार, 20 ऑगस्ट 2017

राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली तेव्हापासून वेळोवेळी निकष बदलण्यात अाले. अाता तिसऱ्यांदा निकष बदलल्याची चर्चा सुरू झाली अाहे. या नव्या बदलांमध्ये तब्बल १६ निकष समाविष्ट केले असल्याने कर्जमाफीचा लाभ मिळणे अाणखीच किचकट बनले अाहे.

राज्य शासनाने घातली आणखी १६ मुद्यांची भर

अकोला : अाधीच विविध निकषांमुळे राज्य शासनाने दिलेली कर्जमाफी गाजत असताना त्यात अाणखी १६ नवीन मुद्दे समाविष्ट करण्यात अाले अाहेत. यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळणे अाणखीच दुरापास्त होईल, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होऊ लागली अाहे. 

राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली तेव्हापासून वेळोवेळी निकष बदलण्यात अाले. अाता तिसऱ्यांदा निकष बदलल्याची चर्चा सुरू झाली अाहे. या नव्या बदलांमध्ये तब्बल १६ निकष समाविष्ट केले असल्याने कर्जमाफीचा लाभ मिळणे अाणखीच किचकट बनले अाहे. शिवाय एवढे निकष पार करून ज्या शेतकऱ्यांचा अर्ज पात्र ठरेल तो अाता नशिबवानच समजला पाहिजे, अशा उपहासात्मक प्रतिक्रियासुद्धा दिल्या जात अाहेत. राज्य शासनाने कर्जमाफीच्या पूर्वीच्या निकषांमध्ये ज्या १६ मुद्यांची भर घातली. त्यात कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्याकडे ८४ महिन्यांपूर्वीची जुनी थकबाकी नसली पाहिजे. शिवाय जमीन खरेदीसाठी घेतलेले कर्ज, वेअरहाउस, शीतगृह, माती परीक्षण, रोपवाटिका, बीज प्रक्रिया, अन्न प्रक्रिया आदींसाठी घेतलेले कर्ज, कृषी चिकित्सा अाणि केंद्र, अन्न प्रक्रिया, कृषी कर्जपुरवठा करणाऱ्या पतसंस्था, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, मायक्रो फायनान्स, सावकाराचे कर्ज, गृहकर्ज, करार शेती, मोटारकार, दुचाकी अादींसाठी घेतलेल्या कर्जाचा यात समावेश अाहे.

अादेशांबाबत माहिती नाही
कर्जमाफीच्या निकषांमधील वाढीबाबत उपनिबंधक, अग्रणी बँक तसेच कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता काहीच माहिती नसल्याचे उत्तर मिळाले. सोमवारी याबाबत माहिती देता येईल, असे अधिकाऱ्यांनी उत्तर दिले. शिवाय कुठेही याची वाच्यता होणार नाही याबाबत विशेष काळजी घेतली जात असल्याचेही समोर अाले अाहे.
 

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...