marathi news sarpanch mahaparishad cm devendra fadnavis | Agrowon

#सरपंचमहापरिषद सरपंचांना अधिक प्रगल्भ बनवते: मुख्यमंत्री
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

आळंदी, पुणे - 'सकाळ अॅग्रोवन'च्या सातव्या सरपंच महापरिषदेला आळंदीत आजपासून (ता. १५) सुरवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या परिषदेला प्रारंभ झाला आहे. राज्यातील निवडकएक हजार सरपंचांचा सहभाग असलेल्या या महापरिषदेचे उद्घाटन सकाळी ११ वाजता संपन्न झाले.

दरम्यान, बुधवारी दुपारपासूनच महापरिषदेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील सरपंच दाखल व्हायला सुरवात झाली होती. या परिषदेसाठी आलेल्या सरपंचांनी ज्ञानोबारायांची आळंदी गजबजून गेली आहे. महिला सरपंचांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणात महापरिषदेला बघायला मिळाली. 

आळंदी, पुणे - 'सकाळ अॅग्रोवन'च्या सातव्या सरपंच महापरिषदेला आळंदीत आजपासून (ता. १५) सुरवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या परिषदेला प्रारंभ झाला आहे. राज्यातील निवडकएक हजार सरपंचांचा सहभाग असलेल्या या महापरिषदेचे उद्घाटन सकाळी ११ वाजता संपन्न झाले.

दरम्यान, बुधवारी दुपारपासूनच महापरिषदेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील सरपंच दाखल व्हायला सुरवात झाली होती. या परिषदेसाठी आलेल्या सरपंचांनी ज्ञानोबारायांची आळंदी गजबजून गेली आहे. महिला सरपंचांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणात महापरिषदेला बघायला मिळाली. 

Agrowon Sarpanch Mahaparishad

महापरिषदेत प्रथम ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे भाषण झाले. सरपंचांच्या कामाविषयी कौतूक करीत त्या म्हणाल्या, 'आम्ही मंत्रालयात सरपंच दरबार भरवतोय. ज्याला चांगला प्रतिसाद आहे. पहिल्यांदा 64 सरपंच उपस्थित दरबाराला उपस्थित होते. सरपंचांची थेट निवडणूक करण्यात येत आहे, हा सरकारचा निर्णय कौतुकास्पद आहे. तरुण सरपंचांची संख्या वाढली आहे.' तसेच सरपंचांना मानधनाचा प्रस्ताव तयार करत आहोत आणि लवकरच तो अंमलात आणला जाईल, असेही त्यांनी यावेळी घोषणा केली. मात्र 'सरकारच्या वित्त आयोगाची भूमिका महत्त्वाची या सर्व प्रक्रियेत महत्त्वाची' असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारकडून 90 टक्के निधी थेट सरपंच आणि गावच्या विकासासाठी सरकारकडून येतो, हे पंकजा मुंडे यावेळी नमूद करायला विसरल्या नाहीत. आपल्या भाषणात मुंडे यांनी केंद्राचे बजेट हे ग्रामीण विकास व शेतकरी हिताचे असल्याचे म्हणत हागणदारी मुक्त गाव, जलसंधारण, पानधन रस्ते, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, आवास योजना, घरकुल योजना आणि अस्मिता योजना यांचा आवर्जून उल्लेख केला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी संप्रदायाला प्रेरणा देण्याचं काम करणारे ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महारांजांची थोरवी व्यक्त करत त्यांच्या ग्रामविकासाबाबतच्या संकल्पनेचा उल्लेख केला. आज झालेल्या अॅग्रोवन सरपंच महापरिषदेसाठी सकाळ समुहाचे अभिनंदन केले. ते म्हणाले,  'व्यवस्थेचा कणा व स्थिरावलेल्या व्यवस्थेचा पाया सरपंच आहे. गावाचा सर्वांगिण विकास हा मूलभूत सोयी, सामाजिक सेवा, आर्थिक सेवा यांवरच अवलंबून असतो. याविषयी नीट काम झालं नाही तर गावाचा स्वयंपूर्ण विकास होणार नाही. योजना सरकारची असेल तर ती सामान्यांपैकी कोणाचीच उरत नाही. त्यामुळे कोणतीही योजना ही सामान्यांसाठी बनायला हवी. ग्रामविकास आणि शेतीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. सोबतच जलसमृद्धी समजून घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. गाव जलस्वयंपूर्ण होण्यासाठी, शेती सेंद्रीय कशी करता येईल याचा विचार व्हायला हवा.'

Agrowon Sarpanch Mahaparishad

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, 'हरीत कंपोस्टची मागणी खुप आहे. गावाची स्वच्छता व कचऱ्याचे विलगीकरणाकडे विशेषत्त्वाने लक्षं देणे गरजेचे आहे. 'सोलर'ची नवीन योजना राज्य सरकार लवकरच घेऊन येत आहे. या योजनेनुसार अॅग्रीकल्चरचे पंम्प हे 'सोलर'वर चालतील.' तसेच 2019 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. एसीसीचं रजिस्ट्रेशन करण्याचे आव्हानही त्यांनी गरजूंना केले आहे. यासाठी केंद्र सरकारची वाट न पाहता राज्य सरकार निधी उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. 2019 पर्यंत 'बेघर मुक्त गाव' बनविण्यात सरपंचाची महत्त्वाची भूमिका राहील, असे ते म्हणाले. 

Agrowon Sarpanch Mahaparishad

आरोग्य योजनेतंर्गत राज्य सरकारची मोफत सेवा उपलब्ध केली गेली आहे याचा आवर्जून उल्लेख मुख्यमंत्री महोद्यांनी केला. मोठ्या आजारांचे निदान व शस्त्रक्रियांसाठी सरकार निधी देईल, असे आश्वासन त्यांनी दिले. रोजगाराविषयी बोलतांना ते म्हणाले,  'सकाळ' समुहासोबत मिळून सरकार अडीच लाख तरुणांना शेतीचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी नोंदणी महत्त्वाची आहे. रोजगाराच्या संधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरपंचाची भूमिका भविष्यात महत्त्वाची राहील. 

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...