मंगळावर पाण्याचे प्रचंड साठे

मंगळ
मंगळ

मंगळावर पाण्याचे साठे असल्याचे नवे पुरावे संशोधकांना मिळाले आहेत. ईओलिस दोर्सा नामकरण केलेल्या मंगळावरील भागात पाण्याचे साठे असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. 

मंगळावर सुमारे साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी पृष्ठभागावर वाहते पाणी होते, असे मत या ग्रहावरील नद्यांच्या प्रवाहासारख्या दिसणाऱया भागाचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांनी मांडले आहे. उपग्रहांद्वारे घेतलेल्या छायाचित्रांचा अभ्यास करून संशोधकांनी हे मत बनवले आहे.

Purple Martian Majesty: Look closely and you’ll see purple and tan bands in this bedrock on Mars. https://go.nasa.gov/2wYoGiG 

मंगळावर आधी प्रवाही नद्या होत्या आणि काही कारणांमुळे प्रवाह आटल्यामुळे आता केवळ काठ शिल्लक राहिले असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील जॅक्सन स्कूल ऑफ जिओसायसेन्समधील संशोधक बी. टी. कार्डेनस आणि त्यांच्या सहकाऱयांनी या छायाचित्रांचा अभ्यास करून मांडलेल्या निष्कर्षानुसार, पृष्ठभागावरील पाणी साठे घटत जाऊन केवळ नद्यांचे काठ शिल्लक राहिले असले तरीही त्यावरून पृष्ठभागाखाली किती पाणी असू शकते, याचा अंदाज बांधता येतो आहे. 

समुद्राच्या भरती-ओहोटीमुळे पृथ्वीवर नद्यांच्या काठांची उंची कमी-जास्त होत राहते. समुद्रातील पाण्याचे प्रमाण वाढले, तरीही नद्यांच्या काठांचे कड्यांमध्ये रुपांतर होते. तशाच प्रकारचे कडे मंगळावर दिसत आहेत. मंगळावर इतक्या मोठ्या प्रमाणावर नद्यांच्या पाण्याची उंची कमी-जास्त होण्यामागे पृष्ठभागाखालील पाण्याचे कारण असावे, असा संशोधकांचा अंदाज आहे. प्रलयासारख्या कारणामुळे नव्हे, तर पृष्ठभागाखालील पाण्यामुळे मंगळावरील नद्यांचा प्रवाह घटून त्या मार्गावर निमुळते कडे तयार झाले असावेत, असे संशोधकांनी मांडले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com