सौंदर्यवर्धक, वेदनाशामक ब्राह्मी, निर्गुडी

सौंदर्यवर्धक, वेदनाशामक ब्राह्मी, निर्गुडी
सौंदर्यवर्धक, वेदनाशामक ब्राह्मी, निर्गुडी

त्वचाविकार अाणि केसांच्या अारोग्यासाठी ब्राह्मी विशेष गुणकारी अाहे. कुठेही उगवणारी, दुर्लक्षित निरगुडी वनस्पतीही वेदनाशामक म्हणून उत्तम काम करते. उंबर, चिंच या वनस्पतीही पित्तशामक आहेत. ब्राह्मी या वनौषधीची पाने बेडकाच्या पंजासारखी दिसतात म्हणून याला ‘मण्डुकपर्णी’ म्हणतात. त्वचेच्या रोगात ब्राह्मी उत्तम गुणकारी आहे. ब्राह्मी तेल डोक्याला लावण्यासाठी श्रेष्ठ आहे. याने मेंदू थंड राहतो, केसांची वाढ होते, स्मृती वाढते. मनःशांतीसाठी; तसेच शांत झोप लागण्यासाठी ब्राह्मी अत्यंत उपयोगी आहे. रक्तशुद्धीवर, मेंदूच्या विकारांवर, जुनाट इसबावर ब्राह्मीच्या पानांचा रस देतात. भूक वाढविण्यास ब्राह्मी अत्यंत उपयोगी आहे. कास, श्वास, स्वरभेदात, हृदय दौर्बल्यात ब्राह्मी उपयुक्त आहे. ब्राह्मीमुळे स्मरणशक्ती वाढते.  

उंबर उंबराची साल, फळ, चीक, रस, पाने यांचा औषधात वापर करतात. उंबर हे पित्तशामक; तसेच तहान भागविणारे आहे. अम्लपित्तावर उंबराची पिकलेली फळे साखरेबरोबर देतात. उष्णतेने अंगाची आग होत असल्यास सालीचे चूर्ण किंवा काढ्याचा उपयोग होतो.  

चिंच चिंच शाकाहारी व्यक्तींना त्यांच्या अन्नातून जे लोह मिळते ते पचायला मदत करते. चिंच, कोकम, आवळा असे आंबट पदार्थ हे लोह पचायला साह्य करतात. आमटीमधे गूळ आणि चिंच घातल्यास गुळातून जे लोह उपलब्ध होते ते पचायला चिंचेची मदत होते. त्यामुळे आमटी-भाजी बनवताना या दोन पदार्थांचा अवश्य उपयोग करावा. ज्यावेळी अन्नावरची वासना उडते त्यावेळेस चिंचेचे सार घ्यावे. इतके ते रुचकर आणि पाचक आहे. झाडाची साल-चिंचेच्या सालीच्या खर्पुड्यांची राख १० ग्रॅम १ कप पाण्यात घालून ते पाणी वरचेवर घेतल्याने उलटी थांबते. आम्लपित्ताची जळजळ आणि उलटी हे पाणी जेवण झाल्यावर वारंवार घेतल्याने थांबते.  अश्वगंधा अश्वगंधा तुपाबरोबर वापरल्यास अधिक उपयुक्त होते. रक्तातील दोषामुळे सांधे लाल होऊन होणाऱ्या संधिवातावर अश्वगंधा गुणकारी आहे.  अश्वगंधा संधिवातावर गुणकारी असून सांध्यांना चोळण्यासाठी अश्वगंधा व मोहरीचे तेल करून वापरतात.

निर्गुडी निर्गुडी वनस्पती रस्त्याच्या कडेला, रानात जागोजागी आढळते. वाताच्या विविध विकारांवर निर्गुंडीचा खूपच चांगला उपयोग होतो. संधिवात, सांधेदुखी, सांध्यांना सूज येणे, गुडघ्याच्या हालचालीला त्रास होणे यावर निर्गुडीचा पाला गरम करून सांध्यांना बांधावा. अंगदुखी, लचक भरणे, शरीराचा विशिष्ट भाग दुखणे, यावरही पाला बांधावा. विशिष्ट भागाला त्वचेखाली सूज आली असता निर्गुडीचा पाला गरम करून बांधावा. निर्गुडी ही उत्तम वेदनाशामक आहे. शरीराच्या कोणत्याही ठिकाणच्या वेदनाशमनासाठी निर्गुडी उपयुक्त आहे. निर्गुडीपासून तेल तयार करतात. या निर्गुडी तेलाचासुद्धा उपयोग संधिवात, सांधेदुखी यासारख्या सर्व आजारांवर होतो.  टीप ः वरिल सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने करावेत.  ः कीर्ती देशमुख, ८२७५४१२०६३,  (विषय विशेषज्ञ गृहविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com