The movement of artificial rain is a bit slow | Agrowon

कृत्रिम पावसाचीही हालचाल मंदच
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 जुलै 2018

‘आयआयटीएम’ने आपल्याशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात होणाऱ्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाबाबत आपल्याला काही माहिती नाही.
- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी

सोलापूर जिल्ह्यात कृत्रिम पाऊस कोणती यंत्रणा पाडणार आहे, याविषयी आपण अनभिज्ञ आहोत. या प्रयोगाबाबत मला काही माहिती नाही.
- विजयकुमार देशमुख, पालकमंत्री

जनावरांचा चारा संपला, पिण्याचे पाणीही संपले आहे. चारा-पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
- मारुती भोसले,
शेतकरी, पांडे, ता. करमाळा

सोलापूर : पावसाळी ढगांप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातील कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची हालचाल मंदावली आहे. भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेने (आयआयटीएम) याबाबत सुरू केलेल्या प्रक्रियेची कोणतीही माहिती जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्र्यांना मिळालेली नाही. त्यामुळे या प्रयोगाच्या भवितव्याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे, पावसाने ओढ दिल्याने कृत्रिम पावसाची मागणी शेतकरी करीत आहेत.

कृत्रिम पावसाच्या भारतातील पहिल्या शास्त्रशुद्ध प्रयोगाला सोलापूर जिल्ह्यात सुरवात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने हा प्रकल्प हाती घेतला आहे. तीन वर्षांसाठीच्या प्रकल्पातील हे दुसरे वर्ष असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत हालचाली दिसून येत नाहीत. ढगात फवारणी करून कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी काही विमाने पुण्यात दाखल होणार होती.

वेदर आणि क्‍लायमेट
‘वेदर फोरकास्टिंग’ आणि ‘क्‍लायमेट’ या दोन्हीचा विचार करून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचा निर्णय झालेला होता. ‘वेदर’ म्हणजे रोजचे तापमान, तत्कालीन स्थिती आणि ‘क्‍लायमेट’ म्हणजे त्या परिसरातील हवामानाची दीर्घकालीन स्थिती. सोलापूर जिल्ह्यातील दोन्हीही गोष्टी दुष्काळीच आहेत. मागच्या १५ वर्षांतील सरासरी पर्जन्यमानही चिंताजनकच आहे. म्हणून सोलापूर जिल्ह्यात कृत्रिम पावसाची गरज आहे.

कृत्रिम पावसाची पांडेत मागणी
पांडे (ता. करमाळा) परिसरातील छोटे-मोठे तलाव पूर्ण आटले आहेत. जनावरांचा चारा संपला आहे. पिण्याच्या पाण्यासाठीही भटकंती करावी लागत आहे. महिना झाला तरी पावसाचा पत्ता नाही. खरीप पिकांचा पेरणी हंगाम कालावधी संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शासनाने कृत्रिम पाऊस पाडावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...