नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचेच वर्चस्व; काँग्रेसला स्पष्ट बहुमत

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचेच वर्चस्व; काँग्रेसला स्पष्ट बहुमत

नांदेड : नांदेड महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रचाराचा इतका जोर लावूनही या महापालिकेवर अशोक चव्हाण यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या 28 जागांपैकी काँग्रेसला 27 जागा मिळाल्या असून भारतीय जनता पक्षाला 1 जागा मिळाली आहे. काँग्रेसला एकूण 47 किंवा अधिक जागा मिळण्याचे संकेत आहेत. 

मतमोजणीच्या अंतिम टप्प्यात 12 जागी काँग्रेस आघाडीवर होती, तर 1 जागी भारतीय जनता पक्ष आघाडीवर होता. भारतीय जनता पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांना पराभव पत्करावा लागला आहे. निवडणुकीपूर्वी पक्षांतर केलेल्यांनाही या निवडणुकीत फटका बसला आहे. 

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी तसेच राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी तसेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ही महापालिका ताब्यात घेण्यासाठी प्रचाराचा जोर लावला होता. मात्र अशोक चव्हाण यांनी आपले प्रभुत्व कायम ठेवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील इथे शेवटच्या टप्यात सभा घेतली होती. मात्र अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती केली होती. देशात 2014 मध्ये सर्वत्र मोदी लाट असताना चव्हाण यांनी नांदेड लोकसभा मतादार संघातून विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांना नांदेड शहरातून 40 हजाराची आघाडी मिळाली होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com