agrowon marathi special news regarding Anganwadi in Parbhani dist | Agrowon

कुपोषणमुक्तीसाठी ११३ अंगणवाड्यांत परसबागा
माणिक रासवे
गुरुवार, 12 जुलै 2018

परभणी (प्रतिनिधी)ः कुपोषणमुक्तीसाठी जिल्ह्यातील ११३ अंगणवाड्यांमध्ये परसबागा विकसित करण्यात आल्या आहेत. आगामी काळात जागा उपलब्ध असेलल्या ठिकाणच्या अंगणवाड्यांमध्ये मॅाडेल परसबागा विकसित करण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यकार्यकारी अधिकारी (बा.क.) डॉ. कैलास घोडके यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागांतर्गंत जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये १ हजार ५८० अंगणवाड्या आणि १४४ मिनी अंगणवाड्या अशा एकूण १ हजार ७२४ अंगणवाड्या आहेत.

परभणी (प्रतिनिधी)ः कुपोषणमुक्तीसाठी जिल्ह्यातील ११३ अंगणवाड्यांमध्ये परसबागा विकसित करण्यात आल्या आहेत. आगामी काळात जागा उपलब्ध असेलल्या ठिकाणच्या अंगणवाड्यांमध्ये मॅाडेल परसबागा विकसित करण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यकार्यकारी अधिकारी (बा.क.) डॉ. कैलास घोडके यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागांतर्गंत जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये १ हजार ५८० अंगणवाड्या आणि १४४ मिनी अंगणवाड्या अशा एकूण १ हजार ७२४ अंगणवाड्या आहेत.
अंगणवाड्यांतील मुला, मुलींना तसेच गरोदर मातांना पोषणमूल्ययुक्त सकस आहार मिळावा, कुपोषणमुक्ती व्हावी या उद्देशाने एकात्मिक महिला व बालविकास कार्यक्रमांतर्गत राजमाता जिजाऊ पोषण मिशनअंतर्गत रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये परसबागा तयार करण्यात येत आहेत. गेल्या दोन वर्षांत ११४ अंगणवाड्यामध्ये परसबागा तयार करण्यात आल्या. परसबागांमध्ये केळी, पपई ही फळझाडे, बीट रूट, पालक, चुका, शेवगा, वांगी, टोमॅटो, फ्लॅावर, कोबी आदी भाजीपाल्यांची लागवड प्राधान्याने केली जात आहे.
२०१६ मध्ये पोखर्णी नृसिंह (ता. परभणी) येथील अंगणवाडीमध्ये परसबाग निर्मितीसाठी देवस्थान तसेच ग्रामस्थांनी मदत केली.अंगणवाडीताई अश्विनी वाघ, मदतनीस भाग्यश्री वाघ या सेंद्रिय पध्दतीने परसबागेचे व्यवस्थापन करत आहेत.या अंगणवाडीमध्ये आधी कुपोषित श्रेणीतील तीव्र १४ लहान मुले होती. परसबागेतील भाजीपाला, फळांचा आहारामध्ये समावेश करण्यात आल्यामुळे ही मुले सामान्य श्रेणीत आली आहेत. याबद्दल पर्यवेक्षिका बी. बी. यादव यांचा महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती राधाताई विठ्ठलराव सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, विस्तार अधिकारी डी. आर. कदम आदींसह ग्रामस्थांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील अंगवाड्यामध्ये परसबागा विकसित होत आहेत. यामुळे माता आणि बालकांच्या कुपोषमुक्तीसाठी मोठा हातभार लागणार आहे.

परसबागा तयार केलेल्या तालुकानिहाय अंगणवाड्या

तालुका अंगणवाडी
परभणी १८
जिंतूर १९
सेलू १०
मानवत
पाथरी १०
सोनपेठ
गंगाखेड १३
पालम १४
पूर्णा १३

प्रतिक्रिया
प्रत्येक अंगणवाडीत परसबाग...
येत्या वर्षात जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये परसबागा विकसित करण्यात येणार आहेत. यामुळे पोषणमूल्ययुक्त आहार मिळेल. कुषोषणमुक्तीसाठी मदत होईल.
- डॉ. कैलास घोडके,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.)
जिल्हा परिषद, परभणी.

 

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...