दक्षिण आफ्रिकेतील स्टेल्लेनबाऊच विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ कॉर्नेली मिन्नार यांनी कीटकां
अॅग्रोमनी
गेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी स्वरूपाच्या मूलभूत कारणांमुळे ही घसरण झालेली नसून अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. पावसाचे प्रमाण, मागणी आणि पुरवठ्याची स्थिती यात फारसा बदल झालेला नाही. अमेरिकेतील वायदेबाजारातील घडामोडींचा परिणाम भारतातील एमसीएक्स वायदेबाजारावरही दिसून आला. एमसीएक्सचा कापसाचा ऑक्टोबरचा वायदा २४,१९० होता, तो १६ ऑगस्टला २३,५३० या भावावर बंद झाला.
गेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी स्वरूपाच्या मूलभूत कारणांमुळे ही घसरण झालेली नसून अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. पावसाचे प्रमाण, मागणी आणि पुरवठ्याची स्थिती यात फारसा बदल झालेला नाही. अमेरिकेतील वायदेबाजारातील घडामोडींचा परिणाम भारतातील एमसीएक्स वायदेबाजारावरही दिसून आला. एमसीएक्सचा कापसाचा ऑक्टोबरचा वायदा २४,१९० होता, तो १६ ऑगस्टला २३,५३० या भावावर बंद झाला. या घसरणीमागेही मूलभूत कारणे नसून ती प्रतिकात्मक असल्याचेच स्पष्ट होते.भारतातील कापूस बाजाराच्या दृष्टीने सकारात्मक बाब म्हणजे देशातील प्रमुख कापूस उत्पादक प्रदेशांमध्ये पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे.
तब्बल २० ते २५ दिवसांच्या खंडानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि तेलंगणा यांसारख्या महत्त्वपूर्ण कापूस उत्पादक राज्यांमध्ये पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. गुजरातमध्येही लवकरच चांगला पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या पावसामुळे कापूस व अन्य पिकांना जीवदान मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे. तसेच, गुलाबी बोंड अळीसारख्या घातक किडीचा प्रादुर्भाव कमी होईल, असाही अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. पुढील १५ दिवस पाऊस चांगला राहिल्यास देशातील कापूस पिकाला चांगला लाभ होईल.
देशांतर्गत रूई बाजारातही वायदेबाजारातील घडामोडींचा परिणाम दिसून येत आहे. गुजरात शंकर-६ ची ४८,५०० ते ४९,००० या दराने खरेदी सुरू आहे. तर महाराष्ट्रातील २९ मिमी धाग्याच्या कापसाच्या रूईचे ४८,००० ते ४८,५०० या दरपातळीला व्यवहार होत आहेत. प्रामुख्याने गिरण्यांकडून खरेदी होत आहे. व्यापारी आणि निर्यातदारांकडून फारशी खरेदी होताना दिसत नाही. कर्नाटकातील डीसीएच वाणाच्या कापसाच्या नवीन पिकाची आवक सुरू झाली आहे. त्याचे व्यवहार ६१,५०० ते ६२,५०० या दरपातळीला होत अाहेत. परंतु, कापसाची आवक आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी आणखी १० ते १५ दिवस वाट पाहावी लागणार आहे.
देशात अनेक ठिकाणी कापसाची लागवड अजूनही सुरू आहे. जस्टॲग्री या खासगी संस्थेच्या अहवालानुसार देशात १६ ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार ११३.६० लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ११९ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली होती. देशात २०१७-१८ मध्ये १२२ लाख हेक्टर क्षेत्र कापूस लागवडीखाली होते.
कापसाच्या दृष्टीने येणारा काळ संवेदनशील आहे. या कालावधीतील घडामोडी, बोंड अळीची स्थिती, आंतरराष्ट्रीय स्तरावरील हालचाली यामुळे कापसाच्या बाजारावर मोठे परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
रुई बाजारावर आगामी काळात खालील घटक प्रभाव टाकण्याची शक्यता आहे...
- अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्धाच्या संदर्भात राजनैतिक तडजोडीचे प्रयत्न.
- अमेरिकी डॉलरच्या तुलनेत कमजोर होत चाललेला भारतीय रुपया.
- देशात पुढील दोन महिने मॉन्सूनची सकारात्मक स्थिती.
- देशात कापसानंतर सगळ्यात जास्त विकल्या जाणाऱ्या फायबर पॉलिस्टरच्या किमतीत प्रतिकिलो ३ रुपयांची वाढ.
- भाजप शासित राज्यांमध्ये कापसावर बोनस दिला जाण्याची शक्यता.
(लेखक कापूस बाजार विश्लेषक असून `कॉटनगुरू`चे प्रमुख आहेत.) www.cottonguru.org
- 1 of 18
- ››