agricultural stories in Marathi, agrowon, technowon, cucumber flowers used for differant purposes | Agrowon

काकडीच्या फुलांचा खाद्यपदार्थ सजावटीसाठी वापर
वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

खाद्य पदार्थांच्या बाजारपेठेत कंपन्या वेगवेगळ्या संकल्पना राबवित असतात. फ्रान्समधील फळे, भाजीपाला आणि सॅलेडचा पुरवठा करणाऱ्या कंपनीने खाद्य पदार्थ सजवण्यासाठी काकडीच्या फुलांचा पुरवठा सुरू केला आहे. या बाबत माहिती देताना कंपनीचे अधिकारी म्हणाले, की आम्ही फ्रान्स तसेच अन्‍य देशांतील विविध हॉटेल्सला हंगामानुसार ताजी फळे, भाजीपाल्याचा पुरवठा करतो. याचबरोबरीने आम्ही विशेष मागणी लक्षात घेऊन खाद्य पदार्थांच्या सजावटीसाठी काकडीच्या फुलांचा पुरवठादेखील सुरू केला आहे. या हॉटेल्सला मध्यम आकाराची फुले लागतात.

खाद्य पदार्थांच्या बाजारपेठेत कंपन्या वेगवेगळ्या संकल्पना राबवित असतात. फ्रान्समधील फळे, भाजीपाला आणि सॅलेडचा पुरवठा करणाऱ्या कंपनीने खाद्य पदार्थ सजवण्यासाठी काकडीच्या फुलांचा पुरवठा सुरू केला आहे. या बाबत माहिती देताना कंपनीचे अधिकारी म्हणाले, की आम्ही फ्रान्स तसेच अन्‍य देशांतील विविध हॉटेल्सला हंगामानुसार ताजी फळे, भाजीपाल्याचा पुरवठा करतो. याचबरोबरीने आम्ही विशेष मागणी लक्षात घेऊन खाद्य पदार्थांच्या सजावटीसाठी काकडीच्या फुलांचा पुरवठादेखील सुरू केला आहे. या हॉटेल्सला मध्यम आकाराची फुले लागतात. आमची कंपनी सुवासिक औषधी वनस्पती, खाद्यमध्ये उपयोगी फुले, सॅलेडसाठी लागणारा भाजीपाल्याचा पुरवठा करते. याचबरोबरीने आम्ही रंगीत फळे, भाजीपाला, विदेशी फळे, भाजीपाल्याचा मागनीनुसार पुरवठा करतो. सध्या खाद्यपदार्थ निर्मिती आणि सजावटीसाठी फळे, फुले आणि भाजीपाल्याची मागणी वाढत आहे.

समुद्रात औषधी वनस्पती, भाजीपाल्याची लागवड
येत्या काळात वाढत्या लोखसंख्येला पुरेसे अन्नधान्य उपलब्ध होण्यासाठी पीक उत्पादन वाढ, नवीन जाती तसेच उत्पादनासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या माहितीनुसार सध्या पृथ्वीवरील उपलब्ध जागेचा विचार करता अकरा टक्के जागा पीक उत्पादनासाठी उपलब्ध आहे. ७५ टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. वाढत्या लाेकसंख्येमध्ये उपलब्ध जागेवर नागरीकरणाचा दबाव आहे. त्यामुळे लागवड क्षेत्रावर देखील मर्यादा येत आहेत. येत्या काळातील पौष्टीक अन्नधान्याची मागणी लक्षात घेता समुद्रातील काही वनस्पती पोषक आहाराचा स्राेत होऊ शकतील का? याबाबत इटलीमधील तज्ज्ञांचा गट अभ्यास करत आहे. या गटातील तज्ज्ञ सध्या समुद्रातील पाण्यामध्ये औषधी वनस्पती आणि भाजीपाल्याचे उत्पादन कसे घेता येईल याबाबत संशोधन करीत आहेत.

इतर टेक्नोवन
दर्जेदार शेती अवजारे निर्मितीत उंद्री...बुलडाणा जिल्ह्यातील उंद्री गावाने शेती उपयोगी...
पुनर्भरणाद्वारे साधली पाण्याच्या...हरियाना येथील कैठाल जिल्ह्यातील मुंद्री, गियोंग,...
अवजारांच्या वापरांमुळे महिलांचे कष्ट...महिलांचा शेती कामातील वाटा लक्षात घेता,...
बंधाऱ्यांची परिस्थिती अन् परिणामसध्या जलसंधारण म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर...
शेतीची कृत्रिम बुद्धिमत्तेकडे वाटचाल...इतिहासाच्या अभ्यासातून भविष्याचा अंदाज घेत...
योग्य प्रकारे ट्रॅक्‍टर चालवा, दुर्घटना...शेतमाल वाहतुकीचा मुख्य स्त्रोत ट्रॅक्‍टर आहे....
कडधान्यांपासून पोषक बेकरी उत्पादनेभारतीय आहारामध्ये प्रथिनाच्या पूर्ततेचे कार्य हे...
ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचालकाची कार्यक्षमता...ट्रॅक्टरसाठी उपग्रह मार्गदर्शक आणि प्रकाश कांडी...
तण नियंत्रणासाठी स्वयंचलित यंत्रणातणे पिकांसोबत पाणी, अन्नद्रव्ये आणि...
फळे, भाजीपाला वाळवणीसाठी ‘डोम ड्रायर’बाजारपेठेतील गुणवत्तापूर्ण उत्पादनांची मागणी...
गहू बीजोत्पादनातून साधली उद्योजकताशिक्षण कमी असतानाही सातत्यपूर्ण कष्ट आणि...
जमीन सुधारणेसाठी मोल नांगरभारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी...
टोमॅटोमध्ये आणता येईल तिखटपणामिरचीचा तिखटपणा त्यातील कॅपासिसीन या घटकांमुळे...
हळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलरकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची...
धान्यांच्या तात्पुरत्या साठवणीचे...अन्नधान्यांचे उत्पादन हे हंगामी होऊन साधारणपणे...
शून्य मशागत... नव्हे, निरंतर मशागतीची...कोणत्याही पिकापूर्वी मशागत झालीच पाहिजे, हा...
शेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत...औरंगाबाद : आपल्या कल्पकतेचा वापर करून देवगिरी...
गव्हाच्या काडाचा भुसा करण्यासाठी भुसा...राहिलेल्या काडापासून भुसा मिळवण्यासाठी भुसा...
पाणी बचत, दर्जेदार उत्पादनासाठी मल्चिंग...पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत...
शाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या...पुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार...