agriculture story in marathi, forward market for agriculture commodities | Agrowon

गव्हाच्या फ्युचर्स भावात मर्यादित वाढ
डॉ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

या सप्ताहात कापूस व हरभरा यांचे भाव घसरले. सोयाबीन, गहू व गवार बी यांचे भाव चढले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत गहू, हरभरा व गवार बी यांचे भाव वाढतील.

चांगल्या पावसामुळे ऑगस्ट महिन्यात कापूस, साखर, सोयाबीन, हळद व हरभरा पिकाच्या किमतींमध्ये घसरता कल दिसून आला. मक्याच्या किमती वाढत होत्या. १ सप्टेंबरपासून जानेवारी २०१९ डिलिवरीसाठी खरीप मका व गहू, फेब्रुवारी २०१९ डिलिवरीसाठी कापूस आणि एप्रिल २०१९ डिलिवरीसाठी हळद यांचे व्यवहार सुरू झाले. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

या सप्ताहात कापूस व हरभरा यांचे भाव घसरले. सोयाबीन, गहू व गवार बी यांचे भाव चढले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत गहू, हरभरा व गवार बी यांचे भाव वाढतील.

चांगल्या पावसामुळे ऑगस्ट महिन्यात कापूस, साखर, सोयाबीन, हळद व हरभरा पिकाच्या किमतींमध्ये घसरता कल दिसून आला. मक्याच्या किमती वाढत होत्या. १ सप्टेंबरपासून जानेवारी २०१९ डिलिवरीसाठी खरीप मका व गहू, फेब्रुवारी २०१९ डिलिवरीसाठी कापूस आणि एप्रिल २०१९ डिलिवरीसाठी हळद यांचे व्यवहार सुरू झाले. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका
रब्बी मक्याच्या (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यातसुद्धा वाढत होत्या (रु. १,३३० ते रु. १,३९३). या सप्ताहात त्या रु. १,३८५ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,३२५ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,४३५ वर आहेत. मागणी वाढती आहे. खरीप मका (सांगली) चा नोव्हेंबर २०१८ डिलिवरी भाव १,३३१ आहे. नवीन हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). अजून या डिलिवरीसाठी फारसे व्यवहार होत नाहीत.

साखर
साखरेच्या (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यातसुद्धा घसरत होत्या (रु. ३,२२१ ते रु. ३,१३३). या सप्ताहात त्या रु. ३,१३४ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१२४ वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. मे (२०१९) च्या फ्युचर्स किमती रु. ३,१३४ वर आल्या आहेत. साखरेतसुद्धा फारसे व्यवहार होत नाहीत.

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या (रु. ३,४२९ ते रु. ३,१८४). या सप्ताहात त्या वाढून रु. ३,३१२ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,४५१ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८, जानेवारी २०१९ व फेब्रुवारी २०१९ च्या किमती अनुक्रमे रु. ३,३५७, रु. ३,४०१ व रु. ३,४४५ आहेत. नवीन हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). सोयाबीनमधील वाढ सोयापेंड निर्यातीत वाढ होण्याच्या अपेक्षेने होत आहे. ऑक्टोबरनंतर सोयाबीन हमी भावाच्या आसपास किंवा अधिक राहण्याची अपेक्षा आहे.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर)च्या किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या (रु. ७,४४४ ते रु. ६,८३६). या सप्ताहात त्या रु. ६,८१० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,००० वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.१ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ६,९२२). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. मात्र, पाऊस चांगला होत असल्याने या वर्षी उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे.

गहू
गव्हाच्या (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यात रु. १९९० ते २०११ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या रु. २,०२८ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,९७४ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,०२२). पुढील काही दिवस मर्यादित वाढ अपेक्षित आहे.

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यात रु. ४,१५० ते रु. ४,६२४ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या रु. ४,३४५ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती ४.८ टक्क्यांनी वाढून रु. ४,३४५ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती १.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४२१).

हरभरा
हरभ-याच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यात १६ तारखेपासून घसरत होत्या (रु. ४,४५२ ते रु. ३,९६९). या सप्ताहात त्या रु. ४,०१४ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,९१० वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ४.७ टक्क्यांनी अधिक आहेत. (रु. ४,०९२). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे ही घट होत आहे. कडधान्याचे उत्पादनसुद्धा वाढण्याची अपेक्षा आहे.

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या. (रु. २४,१८० ते रु. २२,८६०). या सप्ताहात त्या पुन्हा घसरून रु. २२,७०० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २३,११८ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. २२,४९० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. पण, पाऊस समाधानकारक होत असल्याने ही घट होत आहे.
 
arun.cqr@gmail.com

 

इतर अॅग्रोमनी
हळद वगळता सर्व शेतमालाचे भाव तेजीतया सप्ताहात साखर, सोयबीन व हळद वगळता सर्व पिकांचे...
कापूस कोंडी टाळण्यासाठी मिशन मोडवर काम...भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा कापूस उत्पादक...
हळद, हरभऱ्याच्या फ्युचर्स भावात चढ -...या सप्ताहात कापूस, गवार बी व हरभरा वगळता सर्व...
इंटरनेटद्वारे कृषिमालाचे प्रभावी विपणनएकविसाव्या शतकातील माणूसही इंटरनेटच्या वेगाने...
पुढील काही महिने हळदीच्या दरावर ठेवा...या सप्ताहात सोयाबीन व गहू वगळता सर्व पिकांचे भाव...
ऑक्टोबरमध्ये प्रथमच ब्रॉयलर बाजार...ब्रॉयलर्सचे बाजारभाव वर्षातील उच्चांकी पातळीवर...
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची गोचीकोणतेही तातडीचे, आतबट्टायचे काम करायचे असेल तर...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
व्यापारी बँका वित्तीय निरक्षरतेचा फायदा...व्यापारी बँका सामान्य कर्जदारांमधील वित्तीय...
संतुलित पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सच्या...नवरात्रोत्सवामुळे चिकनच्या सर्वसाधारपण खपात मोठी...
नवीन हंगामात कापसाची अडखळती सुरवातदेशात कापसाच्या २०१८-१९ च्या नवीन विपणन हंगामाची...
हमीभाव मनमोहनसिंग सरकारपेक्षा कमी;...नरेंद्र मोदी सरकारने जुलै महिन्यात पिकांच्या...
तेल द्या आणि तांदूळ घ्या; भारताकडून '...अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया दररोज...
थेट विक्रीचे देशी मॉडेलमहाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पुढाकारातून सेंद्रिय व...
शेतीशी नाळ जोडणारा फॅब्रिकेशन व्यवसायफॅब्रिकेशन व्यवसाय एक उत्तम लघू उद्योग आहे. या...
हेमंतरावांची शेती नव्हे ‘कंपनी’च!लखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत...
खरीप मका, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात कापूस, रब्बी मका, सोयाबीन व हरभरा...
कृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...
सोयाबीन, कापूस वगळता इतर पिकांच्या...या सप्ताहात सोयाबीन व कापूस वगळता इतर वस्तूंच्या...
सोयामील निर्यात ७० टक्के वाढण्याचा अंदाजदेशाची सोयामील (सोयापेंड) निर्यात २०१८-१९ या...