agriculture news in marathi, lack of rain in nagar district, maharashtra | Agrowon

नगरमध्ये गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ४० टक्के कमी पाऊस
टीम अॅग्रोवन
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

नगर   ः आता पावसाळ्याचे तीन महिने संपले असले तरी अजूनही जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. केवळ अकोले तालुक्‍यात झालेल्या पावसावरच धरणातील पाणीसाठा वाढला आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत तब्बल ४० टक्के कमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये पाऊस नसला तरी अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात पाऊस सुरू होता. आता तेथेही जवळपास पाऊस थांबला आहे.  

नगर   ः आता पावसाळ्याचे तीन महिने संपले असले तरी अजूनही जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. केवळ अकोले तालुक्‍यात झालेल्या पावसावरच धरणातील पाणीसाठा वाढला आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत तब्बल ४० टक्के कमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये पाऊस नसला तरी अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात पाऊस सुरू होता. आता तेथेही जवळपास पाऊस थांबला आहे.  

यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील अनेक भागांत अजून पाऊस नाही. नगर जिल्ह्यामध्ये तर ऐन पावसाळ्यात पाऊस नसल्याने पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. जवळपास ३० टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाऊस नसल्याने नदी, नाले, गावतलाव, पाझर तलाव व अन्य स्रोतांना पाणीच आले नाही. त्यामुळे आता टॅंकरने पाणीपुरवठा करावा यासाठी प्रस्ताव दिले जात आहेत. विशेषतः शेवगाव, पाथर्डी, जामखेड, पारनेर, संगमनेर, नगर तालुक्‍यांत पाणीटंचाई गंभीर होत आहे.

नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत चार लाख १७ हजार ४७२ हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून थेंबभरही पाऊस झाला नाही. त्यामुळे पिके जगवायची कशी याचे शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. यंदा दोन वर्षांपूर्वीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील पावसामुळे भंडारदरा, निळवंडे व मुळा धरणात पाणीसाठा झाला आहे. त्याचा फायदा राहाता, राहुरी, कोपरगाव, संगमनेर, अकोले, नेवासा, श्रीरामपूरला मिळेल. पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे श्रीगोंदा तालुक्‍याच्या काही भागाला आधार मिळाला आहे. मात्र जिल्ह्याच्या अन्य भागांत मात्र परिस्थिती गंभीर होत असून, अकोल्यातही पाऊस थांबल्याने धरणात येणारी पाण्याची आवकही थांबली आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत गेल्या वर्षी सरासरी १०० टक्के पाऊस झाला होता, यंदा ६० टक्के पाऊस झाला आहे.
 
आता परतीच्या पावसाकडे डोळे
यंदाच्या पावसाळ्याचे तीन महिने उलटले आहेत तरीही जिल्ह्यात अजूनही पाऊस नाही. जिल्ह्याच्या बहुतांश भागात परतीचा पाऊस चांगला पडत असतो. रब्बीचा हंगामही परतीच्या पावसावरच अवलंबून आहे. त्यामुळे आता जिल्ह्याचे लक्ष परतीच्या पावसाकडे लागले आहे. मात्र सध्याचे वातावरण पाहता पाऊस येईल याची कोणालाही शाश्‍वती वाटत नाही. असे असले तरी शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाकडे डोळे लागले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...
जैविक शेती मिशन राबविण्यास प्रारंभअकोला ः शासनाने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या डॉ....
जळगावसह रावेर मतदारसंघ भाजपकडेच?जळगाव ः आगामी लोकसभा निवडणुकीसंबंधी शिवसेना व...
किसान लाँग मार्चला जाणाऱ्या शेतकऱ्यांना...धुळे  : किसान लाँग मार्चमध्ये सहभागी...
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...