agriculture news in marathi, crop loan distribution target for rabbi season, nanded, maharashtra | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीसाठी ८९३ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट
टीम अॅग्रोवन
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतील विविध बॅंकांना येत्या रब्बी हंगामात ८९३ कोटी ३४ लाख ३४ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. परंतु सद्यःस्थितीत खरीप पीक कर्ज वाटपाची गती अत्यंत धीमी आहे. त्यामुळे रब्बी पीक कर्ज वाटप लांबणीवर पडणार आहे.

परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतील विविध बॅंकांना येत्या रब्बी हंगामात ८९३ कोटी ३४ लाख ३४ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. परंतु सद्यःस्थितीत खरीप पीक कर्ज वाटपाची गती अत्यंत धीमी आहे. त्यामुळे रब्बी पीक कर्ज वाटप लांबणीवर पडणार आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये यंदा ४२० कोटी ८७ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या ३२३ कोटी ३७ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या ३८ कोटी २१ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ५९ कोटी २९ लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बॅंकांना २०७ कोटी ११ लाख ३१ हजार रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला ३१ कोटी ८२ लाख १७ हजार रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला ७४ कोटी ५३ लाख ८६ हजार रुपये असे एकूण ३१३ कोटी ४७ लाख ३४ हजार रुपये रब्बी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील बॅंकांना १५९ कोटी रुपये रब्बी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या ११८ कोटी रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या १७ कोटी रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या २४ कोटी रुपये उद्दिष्टांचा समावेश आहे. दरवर्षी एक आॅक्टोबरपासून रब्बी पीक कर्ज वाटपास सुरुवात होते. परंतु यंदा खरीप पीक कर्ज वाटपास विलंबाने सुरुवात झाली. सद्यःस्थितीत राष्ट्रीयीकृत बॅंकांसह अन्य बॅंकांची पीक कर्ज वाटपाची गती अत्यंत संथ असल्याने उद्दिष्टपूर्ती दूरच आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटप लांबणीवर पडणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...