agriculture news in marathi, agitation aginest fuel price hike, varhad, maharashtra | Agrowon

सर्वपक्षीय ‘बंद’ला वऱ्हाडात संमिश्र प्रतिसाद
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

अकोला  ः देश आणि राज्यात इंधनाच्या वाढलेल्या किमती पाहता शासनाचा निषेध करण्यासाठी सोमवारी (ता. १०) काँग्रेस व समविचारी पक्ष, संघटनांनी ‘बंद’ची हाक दिली होती. या ‘बंद’ला वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये संमिश्र स्वरूपात यश मिळाले. सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. दुपारपासून व्यवहार, वाहतूक पूर्वपदावर यायला सुरवात झाली. बाजार समित्यांमधील अावकेवर काहीसा परिणाम झालेला दिसून अाला.

अकोला  ः देश आणि राज्यात इंधनाच्या वाढलेल्या किमती पाहता शासनाचा निषेध करण्यासाठी सोमवारी (ता. १०) काँग्रेस व समविचारी पक्ष, संघटनांनी ‘बंद’ची हाक दिली होती. या ‘बंद’ला वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये संमिश्र स्वरूपात यश मिळाले. सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. दुपारपासून व्यवहार, वाहतूक पूर्वपदावर यायला सुरवात झाली. बाजार समित्यांमधील अावकेवर काहीसा परिणाम झालेला दिसून अाला.

देशात व त्यातही राज्यात प्रामुख्याने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ होत अाहे. या वाढीमुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले अाहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने भारत बंद पुकारला होता. या अावाहनाला राज्यातील विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी अादी पक्षांनी पाठिंबा दिला.

विरोधकांच्या सर्वपक्षीय बंदच्या आवाहनाला व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला. एसटी महामंडळाच्या बसेस, तसेच इतर प्रवाशी वाहतूक सुरळीत होती. अकोला जिल्ह्यातील पेट्रोल पंप दुपारी १२ वाजेपर्यंत कडकडीत बंद होते. याबाबत पेट्रोल- डिझेल डीलर, विक्रेते असोसिएशनने निर्णय घेतला होता.

बाजार समित्यांमध्ये अावक मंदावलेली
भारत बंदमुळे बाजार समित्यांमधील व्यवहारांवर थोडाफार परिणाम झालेला  दिसून अाला. मुळातच गेल्या १५ दिवसांपासून बहुतांश बाजार समित्या बंद होत्या. मागील अाठवड्यात त्यांचे व्यवहार सुरू झाले. त्यानंतर सोमवारी  अाठवड्याच्या पहिल्याच दिवशी हा बंद अाल्याने शेतकऱ्यांनी शेतमालाची अावक कमी केली. अकोला, खामगाव, मलकापूर, वाशीम, मालेगाव, कारंजा, अकोट अशा सर्वच महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये या ‘बंद’चा परिणाम दिसून अाला. अद्याप मूग वगळता इतर शेतीमालाचा हंगाम नसल्याने बाजार समित्यांमधील व्यवहारही तसे जेमतेम अाहेत.

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात उत्साहात मतदानसातारा  : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभा...
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...