agriculture news in marathi, Rainfall stop in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात पावसाची दडी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

नाशिक  : नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने दडी मारली असून, त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पावसाने पाठ फिरवल्याने काही दिवसांपासून धरणांमधील पातळीत वाढ होऊ शकलेली नाही. त्यामुळे यंदा पाऊस सरासरी गाठणार की नाही, याची चिंता सतावू लागली आहे.

नाशिक  : नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने दडी मारली असून, त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पावसाने पाठ फिरवल्याने काही दिवसांपासून धरणांमधील पातळीत वाढ होऊ शकलेली नाही. त्यामुळे यंदा पाऊस सरासरी गाठणार की नाही, याची चिंता सतावू लागली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ८० टक्के पाऊस झाला असला तरी गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा पावसाचा जोर कमीच राहिला. सप्टेंबरचा पहिला पंधरवडा कोरडा जाण्याची शक्यता आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा या चारच तालुक्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावत आहेत. तेथेही रोज फार तर दोन ते पाच मिलिमीटर पावसाची नोंद होत आहे. उर्वरित ११ तालुक्यांकडे पाच दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली आहे.

दिंडोरी, निफाड, येवला, मालेगाव, कळवण या तालुक्यांमध्ये पाच सप्टेंबर रोजी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या होत्या. या दिवशी जिल्ह्यात ७२.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र, त्यानंतर पाऊस गायब झाला आहे. गुरुवारी (ता. ६) १४ मिमी, शुक्रवारी (ता. ७) आणि शनिवारी (ता. ८) सात मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, रविवारीही (ता. ९) एवढाच पाऊस नोंदविला गेला. जिल्ह्यात आतापर्यंत ८४५.७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

धरणांमध्ये ८० टक्केच पाणी
जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये आजमितीस ८० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह इगतपुरीत काही प्रमाणात पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. त्यामुळे आळंदी, करंजवण, दारणा, भावली, वालदेवी, हरणबारी आणि पुनद या धरणांमधून अल्प प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गिरणा खोऱ्यातील अनेक धरणांना अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...
नगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...
सोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...
जळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
हळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...
सागरी तापमानाची जुनी माहिती मिळवणे...माहितीच्या नोंदीच्या अभावामुळे बहुतांश जागतिक...
मधमाश्यांचे सर्वेक्षण सातत्याने...गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक मधमाश्यांच्या...
बुलडाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेबुलडाणा : उष्णतेच्या झळा सुरू होण्यापूर्वीच...
खानदेशात तूर खरेदी केंद्रे सुरू कराजळगाव : खानदेशात तुरीची मळणी पूर्ण होत आली आहे....
ऊस गाळपात नंदुरबार जिल्हा आघाडीवरजळगाव : खानदेशात ऊस गाळपात नंदुरबार जिल्ह्यातील...
नाचणी बीजोत्पादक शेतकऱ्यांना पन्हाळ्यात...कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात आत्माच्या...
गोदावरी दूध संघ शेतकऱ्यांसाठी ठरला ‘...नगर : ‘‘गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
परभणी, हिंगोलीतील सिंचनासाठीच्या...परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २०१७-१८...
खरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या...सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात...