agriculture news in marathi, polluted water supply to villages, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यातील ९० गावांना दूषित पाणीपुरवठा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

नगर  ः ग्रामीण भागाला शुद्ध पाणीपुरवठा करावा असे शासनाचे आदेश असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे जिल्हाभरात सध्या सुमारे ९० गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यात पारनेर तालुक्‍यातील सर्वाधिक गावे असल्याची बाब आरोग्य विभागाच्या मासिक तपासणीत स्पष्ट झाली आहे.

नगर  ः ग्रामीण भागाला शुद्ध पाणीपुरवठा करावा असे शासनाचे आदेश असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे जिल्हाभरात सध्या सुमारे ९० गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यात पारनेर तालुक्‍यातील सर्वाधिक गावे असल्याची बाब आरोग्य विभागाच्या मासिक तपासणीत स्पष्ट झाली आहे.

ग्रामीण भागातील गावखेड्यात शुद्ध पाणी मिळावे यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत विभागामार्फत उपाययोजना राबवल्या जातात. गावांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी प्रत्येक गावांत एक जलसुरक्षक नियुक्तकेला आहे. याशिवाय पाणी शुद्धीकरणासाठी टीसीएल पावडरही दिली जाते. मात्र या साऱ्या उपाययोजनांकडे ग्रामपंचायती दुर्लक्ष करत असल्याची बाब समोर आली आहे.

पाणी शुद्धीकरणासाठी लागणाऱ्या साहित्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने जिल्ह्यामधील सुमारे ९० गावे दूषित पाणी पीत असल्याचे आरोग्य विभागाच्या मासिक अहवालात स्पष्ट झाले आहे. जुलै महिन्याच्या अहवालानुसार १८३४ पाणी नमुने तपासले. त्यातील ९० गावांमधील १३८ स्रोतांचे पाणी दूषित असल्याचे आढळून आले आहे. एप्रिलपासून जुलैपर्यत म्हणजे चार महिन्यांत ६७५९ स्रोत तपासले त्यातील ४९७ स्रोताचे पाणी दूषित आढळले आहे. याशिवाय पाच गावांत पाणी शुद्धीकरणासाठी वापरली जाणारी टीसीएल पावडरही खराब आहे.

दूषित पाणीपुरवठा होणारी गावे
पारनेर ः
गारगुंडी, पिपळगाव रोठा, म्हस्केवाडी, चोंभुत, शिरापूर, रांधे, पिंपळनेर, पळवे बु. बाभुळवाडे, पाडळी दर्या, लोणी हवेली, सुपा, हंगा, मावळेवाडी, नारायणगव्हाण, यादववाडी, गटेवाडी, वांघुंडे खु., कडूस, पाडळी, वाडेगव्हाण, वाघुंडे, बु. अकोले ः मोग्रस, पांजरे, शेरणखेल, कळंब, बेलापूर, कोलठेंभे, शिरपुंजे, साकीरवाडी, कौठेवाडी, गर्दनी, नागवाडी, देवठाण, घोडसरवाडी. नगर ः देवगाव, सारोळा, घोसपुरी, पारगाव, खांडके, बारदरी, केकती, नवनागापूर, वडगाव गुप्ता, दशमीगव्हाण. संगमनेर ः रणखांब, पेमगिरी, संगमनेर खु,. पिंपळगाव कोंजिरा, चिकणी, डोळासणे, जोर्वे, मनोली, प्रतापपूर, भोजदरी. शेवगाव ः आव्हाणे, नांदूर, जोहरापूर, मजले शहर, बोधेगाव, मळेगाव, भातकुडगाव, आंतरवाली, खामपिंप्री. पाथर्डी ः जिरेवाडी, केळवंडी, आल्हाणवाडी, चुंभळी, करडवाडी, मुंगुसवाडे, शिराळ, पाथर्डी शहर. राहुरी ः शेलेगाव, टेकाडवाडी, काद्रड, चेडगाव, गुंजाळे, कोल्हार, बु, केंदळ. जामखेड ः कुसडगाव, सदरवाडी, पाटोदा, खामगाव, भोगलवाडी, दरडवाडी, बाळगव्हाण. श्रीगोंदा ः कोळगाव, मानमोडी, घारगाव, ढोरजा, कोथुळ. कोपरगाव ः जवळके, दहीगाव बोलका, घारी, मढी बु. कर्जत ः वायसेवाडी, करभणवाडी, खेड. नेवासा ः मंगळापूर, गोगलगाव, पिचडगाव. राहाता ः लोणी बु, राजुरी, एकरुखे. श्रीरामपूर ः मालुंजा.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...