agriculture news in marathi, subsidy will be given to 10 thousand tractors | Agrowon

बारा हजार ट्रॅक्टर्सला मिळणार अनुदान !
टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

मुंबई : उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरताना दिसून येत आहे. योजनेत आतापर्यंत १२ हजार ७५१ शेतकऱ्यांना ८६ कोटी ८ लाख रुपयांचे अनुदान थेट खात्यांवर जमा करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या योजनेतून यापूर्वी वर्षाला फक्त तीनशे ते चारशे ट्रॅक्टर्ससाठी अनुदान दिले जायचे. यंदा प्रथमच सुमारे ४ हजार ट्रॅक्टर्ससाठी अनुदान देण्यात आले आहे. तर वर्षभरात तब्बल दहा ते बारा हजार ट्रॅक्टर्ससाठी अनुदान देण्याचे उद्दिष्ट कृषी खात्याने ठेवले आहे.

मुंबई : उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरताना दिसून येत आहे. योजनेत आतापर्यंत १२ हजार ७५१ शेतकऱ्यांना ८६ कोटी ८ लाख रुपयांचे अनुदान थेट खात्यांवर जमा करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या योजनेतून यापूर्वी वर्षाला फक्त तीनशे ते चारशे ट्रॅक्टर्ससाठी अनुदान दिले जायचे. यंदा प्रथमच सुमारे ४ हजार ट्रॅक्टर्ससाठी अनुदान देण्यात आले आहे. तर वर्षभरात तब्बल दहा ते बारा हजार ट्रॅक्टर्ससाठी अनुदान देण्याचे उद्दिष्ट कृषी खात्याने ठेवले आहे.

राज्यात यंदा उन्नत शेती, समृद्ध शेतकरी हे अभियान राबविले जात आहे. या अभियानात कृषि खात्यातील वेगवेगळ्या योजना एकत्रितपणे आणि सुटसुटीतपणे राबविण्यात येत आहेत. यात कृषी यांत्रिकीकरण ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत मजूर टंचाई आणि इतर बाबींचा विचार करून ट्रॅक्टरसह पंधरा प्रकारची यंत्रे, औजारे दिली जाणार आहेत. यात तांदूळ आणि डाळींच्या गिरण्यांचाही समावेश आहे. त्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना, यांत्रिकीकरण योजना, अन्न सुरक्षा आणि गळीत धान्य अशा चार योजना एकत्र करण्यात आल्या आहेत. या योजनांचा एकत्रित 198 कोटी रुपयांचा निधी चालू वर्षासाठी मंजूर करण्यात आला आहे. योजनेसाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने एकाचवेळी जाहिरात देऊन शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले होते.

कृषी खात्याच्या या आवाहनाला राज्यातील शेतकऱ्यांमधून उदंड प्रतिसाद मिळाला. तब्बल १ लाख २० हजार शेतकऱ्यांनी योजनेसाठी प्रतिसाद दर्शविला. त्यापैकी ७२ हजार शेतकऱ्यांना कृषी खात्याने खरेदीसाठी पूर्वसंमती दिली. त्यापैकी ३२ हजार शेतकऱ्यांनी खरेदीची तयारी दाखवली. यातल्या १३ हजार ४०० शेतकऱ्यांनी औजारे खरेदी करून अनुदानाचे प्रस्ताव सादर केले. १३ नोव्हेंबरअखेर त्यापैकी १२ हजार ७५१ शेतकऱ्यांना ८६ कोटी ८ लाख रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले. तर उर्वरीत सुमारे सातशे शेतकऱ्यांच्या अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. यानंतर जस जसे शेतकऱ्यांचे अनुदानाचे प्रस्ताव प्राप्त होतील त्यानुसार अनुदान वर्ग केले जाणार आहेत. सध्या मंजूर असलेले १९८ कोटी रुपये खर्च झाल्यानंतर आणखी दोनशे कोटी रुपयांचा निधी या कार्यक्रमासाठी देण्याचे प्रस्तावित आहे. टप्प्याटप्प्याने हा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे मंत्रालयातील उच्च पदस्थांनी स्पष्ट केले.

ऑनलाइन सोडत काढून यंत्रसामग्रीचे वाटप
ही योजना अधिक पारदर्शक आणि समन्यायी तत्त्वावर राबविण्यासाठी कृषी खात्याने प्रत्येक टप्प्यावर आवश्यक खबरदारी घेतली आहे. याआधी कृषी उद्योग विकास महामंडळाने सूचविलेली यंत्रे, औजार घेण्याची सक्ती होती. आता या योजनेत शेतकऱ्यांना यंत्रे, औजारे घेण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उपयोगाची साधने, स्वतःच्या पसंतीनुसार घेता येत आहेत. यंत्रे, औजारांची खरेदी पावती दाखवल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होत आहे. कृषी खात्याकडून ऑनलाइन सोडत काढून शेतकऱ्यांना या यंत्रसामग्रीचे वाटप केले जात आहे.

मागणीनुसार खर्च करावा निधी
कृषी खात्याने ४० % निधी ट्रॅक्टर्ससाठी तर उर्वरीत निधी इतर यंत्रांसाठी खर्च करण्याचे बंधन घातले आहे. मात्र, काही जिल्ह्यात ट्रॅक्टर्स, इतर यंत्रे, औजारे यांना शेतकऱ्यांची गरजेनुसार मागणी येत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी ४०:६० धोरणानुसार शिल्लक राहणारा निधी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खर्च करण्याचे सुधारीत निर्देश कृषी खात्याने जारी केले आहेत.

ट्रॅक्टर्सला दिले जाणारे अनुदान
सर्वसाधारण शेतकरी : मोठा ट्रॅक्टर - 1 लाख, छोटा ट्रॅक्टर - 75 हजार रुपये
इतर शेतकरी : मोठा ट्रॅक्टर - सव्वा लाख, छोटा ट्रॅक्टर - एक लाख रुपये

 

इतर अॅग्रो विशेष
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...
उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...