agricultural news in marathi, news regarding artificial shape of fruits and vegetables, Agrowon, Maharashtra | Agrowon

खास हॅलोवीनसाठी मानवी चेहऱ्याचे भोपळे !
कोजेन्सिस वृत्तसेवा
सोमवार, 18 डिसेंबर 2017

अमेरिकेत हॅलोवीन या सणामध्ये भोपळ्याला असलेले महत्त्व लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी अमेरिकेतील शेतकऱ्यांनी भोपळ्याच्या फळाला मानवी चेहऱ्याच्या साच्यामध्ये बसविण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

जपानमधील काही कंपन्यांनी खास प्रकारच्या साच्याचा वापर करून काही वर्षांपूर्वी चौकोनी आकाराचे कलिंगड बाजारपेठेत आणले. त्याला ग्राहकांच्याकडून चांगली मागणीदेखील मिळाली. त्यामुळे अमेरिकेतील काही फळ उत्पादक कंपन्या आणि शेतकऱ्यांनी भोपळ्याला साच्याच्या माध्यमातून आकार देता येईल का, याचे प्रयोग सुरू केले. त्यात त्यांना यश मिळाले आहे.

अमेरिकेत हॅलोवीन या सणामध्ये भोपळ्याला असलेले महत्त्व लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी अमेरिकेतील शेतकऱ्यांनी भोपळ्याच्या फळाला मानवी चेहऱ्याच्या साच्यामध्ये बसविण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

जपानमधील काही कंपन्यांनी खास प्रकारच्या साच्याचा वापर करून काही वर्षांपूर्वी चौकोनी आकाराचे कलिंगड बाजारपेठेत आणले. त्याला ग्राहकांच्याकडून चांगली मागणीदेखील मिळाली. त्यामुळे अमेरिकेतील काही फळ उत्पादक कंपन्या आणि शेतकऱ्यांनी भोपळ्याला साच्याच्या माध्यमातून आकार देता येईल का, याचे प्रयोग सुरू केले. त्यात त्यांना यश मिळाले आहे.

हॅलोवीन सणामध्ये अशा प्रकारच्या भोपळ्याला ग्राहकांची संभाव्य मागणी लक्षात घेऊन काही शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला. अमेरिकेतील कंपन्यांनी भोपळ्यांना मानवी चेहऱ्याचा आकार देण्यासाठी विशिष्टप्रकारचे साचे तयार करून दिले. यंदाच्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर शेतकऱ्यांनी साच्‍याचा वापर करून भोपळ्याचे उत्पादनदेखील घेतले.

फळाला आकार देण्यासाठी वाढीच्या विशिष्ट टप्प्यामध्ये साचा फळावर बसवावा लागतो. कारण या टप्प्यात फळ आणि वेल दोन्हीही नाजूक असते. भोपळा फळावर साचा बसविण्यासाठी कुशल मजुराची आवश्यकता असते. फळाच्या विशिष्ट वाढीच्या टप्प्यानंतर हे साचे परत काढावे लागतात. त्यामुळे पुढे फळवाढीवर परिणाम होत नाही.
यंदाच्यावर्षी काही शेतकऱ्यांना फळांना आकार देण्यामध्ये चांगले यश मिळाले. पहिल्यावर्षीच्या अनुभवातून पुढील वर्षातील हंगामासाठी शेतकरी या प्रयोगामध्ये सुधारणा करणार आहेत. काही मोठ्या दुकानदारांच्याकडूनही अशा प्रकारच्या भोपळ्यांना मागणी आली असल्याने पुढील वर्षीदेखील काही भोपळा उत्पादक साच्याचा वापर करून वैशिष्ट्यपूर्ण भोपळ्यांचे  उत्पादन घेणार आहेत. 

इतर अॅग्रो विशेष
वेतन आयोग ठीक; पण शेतकरी आयोगाचे काय?१९४७ ते १९९० आणि १९९० ते २०१८ असे दोन भाग केले,...
वीजवापरातील ‘अंधार’वी ज दरवाढ तसेच शेती पंपासाठीची बिलं दुरुस्त करून...
परोपजीवी मित्रकीटकांची ओळखअळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या...
सांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....
साखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे  : दुष्काळी स्थितीमुळे साखर...
नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव  ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...
ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...
टंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...
विदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (...
‘एफआरपी’ची थकबाकी ४० हजार कोटींपर्यंत...पुणे : साखर उद्योगात तयार झालेल्या संकटामुळे...
गूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देणे...मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपतानाच...
दुधाळ जनावरे वाटप योजनेत देशी गाईंचा...पुणे : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ...
बांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण...सोलापूर : ‘‘बांबू हे गवतवर्गीय पीक आहे....
‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या...मुंबई : देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’...
वेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...
दूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
केळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...