agricultural news in marathi, farmer's ideas while doing agriculture, Agrowon, Maharashtra | Agrowon

कल्पनेतून केली अडचणींवर मात
कोजेन्सिस वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

जगभरात शेतकरी आपली दैनंदिन कार्य करीत असताना अनेक अडचणींना तोंड देत असतात. मात्र स्वकल्पनेतून समस्यांवर मात करण्यात ते यशस्वी ठरतात. अमेरिकेतील काही शेतकऱ्यांनी केलेले हे प्रयोग निश्चितपणे मार्गदर्शक ठरणारे आहेत.

जगभरात शेतकरी आपली दैनंदिन कार्य करीत असताना अनेक अडचणींना तोंड देत असतात. मात्र स्वकल्पनेतून समस्यांवर मात करण्यात ते यशस्वी ठरतात. अमेरिकेतील काही शेतकऱ्यांनी केलेले हे प्रयोग निश्चितपणे मार्गदर्शक ठरणारे आहेत.

हायड्रॉलिक नळ्यांसाठी स्प्रिंगचा वापर  
अमेरिकेतील आयोवा राज्यातील उडूबॉन येथील शेतकरी जेम्स नेल्सन हे कायम शेतीकामात व्यस्त असतात. त्यांच्याकडे असलेल्या ट्रॅक्टरच्या हायड्रॉलिक प्रणालीतील रबरी नळ्या खूप लांब आहेत. जास्त लांबीमुळे शेतात कामेे करताना तसेच खड्ड्यातून गेल्याने किंवा इतर कारणांनी ट्रॅक्टरला धक्का बसल्यास या नळ्या तुटतात. यावर त्यांनी उपाय शोधला. मोडकळीस आलेल्या जीपच्या कॉइल स्प्रिंग त्यांनी रबरी नळीमध्ये बसविली. असे केल्याने रबरी नळी स्प्रिंगमुळे ताणली गेली. ट्रॅक्टर ज्याप्रमाणे फिरेल त्याप्रमाणे कोणत्याही दिशेने स्प्रिंग हालू शकत असल्याने रबरी नळीही हलते. परिणामी, ट्रॅक्टरला बसणाऱ्या विविध धक्क्यांनंतरही रबरी नळी तुटत नाही.

लाकडी ओंडके वाहतुकीसाठी मजबूत साधन
अमेरिकेतील कन्सास राज्यातील सेेंट मॅरीज येथील शेतकरी रिचर्ड पीटर्स यांना शेतात विविध ठिकाणी तसेच शेततळ्यामध्ये पडणाऱ्या झाडांचे ओंडके उचलण्याची समस्या भेडसावत होती. असे लाकडी ओंडके वाहून नेण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे हूक उपलब्ध आहेत. मात्र ते पुरेसे मजबूत नसल्याने त्यांचा उपयोग हाेत नव्हता. अखेर त्यांनी जुन्या ट्रकच्या स्प्रिंगमधून तोडली. एका मजबूत लोखंडी बारला ती वेल्डिंग करून जोडली. अशाप्रकारे तयार केलेल्या साधनाच्या साह्याने त्यांचे काम सोपे झाले. त्यासाठी काही वेल्डिंग रॉड आणि लोखंड कापणाऱ्या पट्टी यांच्यासाठी थोडा खर्च त्यांना करावा लागला. मात्र मोठमोठे लाकडी ओंडके ओढण्यासाठी मजबूत साधनाची निर्मिती करता आली.

फ्यूज काढण्यासाठी बनविली यंत्रणा
ट्रॅक्टर तसेच मोठ्या वाहनांमध्ये विविध विद्युत यंत्रणा कार्यरत असतात. त्यांच्या संरक्षणासाठी काचेचे फ्यूज बसविलेले असते. बऱ्याचदा विविध कारणांनी या फ्यूजमध्ये बिघाड होतो. दुरुस्तीसाठी किंवा बदलण्यासाठी फ्यूज बाहेर काढावे लागतात. मात्र फ्यूज बाहेर काढताना बऱ्याचवेळा फुटतो. अमेरिकेतील दक्षिण डिकोटा राज्यातील सायमन ग्लॅंझर या शेतकऱ्यालाही फ्यूज तुटण्यामुळे आर्थिक नुकसान होत होते. मात्र त्यांनी त्यावर उपाय शोधला. त्यांनी टोकदार पक्कड घेतली. तिच्या तोंडाचा काही भाग वेल्डिंग करून कापला; त्याला ड्रील मशिनने फ्यूजच्या आकाराचे छिद्र पाडले. त्यामुळे त्यांना दुरुस्तीसाठी फ्यूज बोर्डमधून बाहेर काढणे सोपे जाऊ लागले. बोर्डला कसलाही धक्का न बसता फ्यूज काढणे आणि परत बसविणे सहज शक्य झाले.

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...
नगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर  ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...
वाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम  ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...
खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...