नगर ः सरकार शहरांचे पोषण करण्यासाठी खेड्यांचे शोषण करत आहे.
ताज्या घडामोडी
दालचिनी लागवड अतिपावसाळा सोडून कोणत्याही महिन्यात करता येते. नारळाच्या बागेत लागवड करायची झाल्यास झाडापासून दोन मीटर अंतरावर लागवड करावी.
सलग लागवड करायची झाल्यास १.२५ x १.२५ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती, एक घमेले शेणखत, २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व १०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश यांच्या मिश्रणाने खड्डे भरून ठेवावेत. लागवडीसाठी कोकण तेज, नित्यश्री, नवश्री या जाती निवडाव्यात. खड्ड्याच्या मधोमध गुटी कलमांची लागवड करावी. कलमांना काठीचा आधार द्यावा.

संपर्क : ०२३५८- २८०५५८
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी
- 1 of 349
- ››