one hundred Twenty five Quintal Tur Scam in Beed | Agrowon

बीडमध्ये सव्वाशे क्विंटल तुरीचा गोलमाल
टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

बीड : हमीभावाने खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या १२१ क्विंटल तुरीचे तीन महिन्यांपासून पैसे तर दिलेच नाहीत, उलट पैशाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच गुन्हे नोंद करण्याची नोटीस देण्याचा प्रताप बीड जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेने केला आहे. दरम्यान, या प्रकरणी आमदार अमरसिंह पंडित यांच्या पाठपुराव्यानंतर चौकशीचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत.

बीड : हमीभावाने खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या १२१ क्विंटल तुरीचे तीन महिन्यांपासून पैसे तर दिलेच नाहीत, उलट पैशाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच गुन्हे नोंद करण्याची नोटीस देण्याचा प्रताप बीड जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेने केला आहे. दरम्यान, या प्रकरणी आमदार अमरसिंह पंडित यांच्या पाठपुराव्यानंतर चौकशीचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत.

मागच्या हंगामात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर खरेदीचा प्रश्‍न जटील झाला. चोहोबाजूने मागणी आणि सरकार विरोधात टीका झाल्यानंतर शासनाने नाफेडमार्फत हमीभावाने तूर खरेदी केली. जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनमार्फत ही खरेदी झाली.गेवराईच्या बाजार समितीत बीड जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेमार्फत खरेदी केंद्र उघडण्यात आले.

दरम्यान, पाचेगाव (ता. गेवराई) येथील शहादेव खरसाडे, गणेश खरसाडे, शकुंतला देशमुख, गणेश कापसे, नागनाथ कापसे, सुरेश दाभाडे, तुकाराम ननवरे या शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्रावर तूर आणली. या शेतकऱ्यांनी १२१ क्विंटल तूर विकली. शेतकऱ्यांकडे तुरीसाठीचे टोकण, केंद्रावर विक्री केल्याचे पुरावे आदी सर्व गोष्टी आहेत. २० ते ३१ मेच्या दरम्यान या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर तूर दिल्यानंतर त्यांना अजूनही या तुरीचे पैसेच मिळाले नाहीत, हे विशेष.

केंद्रावर विकलेल्या इतर शेतकऱ्यांना तुरीचे पैसे मिळाल्यानंतर वरील शेतकऱ्यांनी पैशासाठी पाठपुरावा केला; मात्र संस्थेच्या अधिकाऱ्यांनी पैसे देण्याऐवजी शेतकऱ्यांनाच गुन्हे दाखल करण्याची नोटीस दिली. मागील अनेक दिवसांपासून हे शेतकरी विविध कार्यालयांत खेटे घालत आहेत. दरम्यान, १२१ क्विंटल तुरीचे साधारण सहा लाख रुपये होतात. हा गोलमाल कोणत्या अधिकाऱ्याने केला, हे चौकशीनंतर उघड होणारच आहे.

आमदार पंडित यांच्या तक्रारीनंतर दखल
संबंधित शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानंतर आमदार अमरसिंह पंडित यांनी मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रार केली. पैसे न देता गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्याचा प्रकार गंभीर असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या प्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी तालुका सहायक निबंधकांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश गुरुवारी (ता. १६) दिले आहेत.

इतर बातम्या
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या...
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणाजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...पुणे : राज्यात विनापरवाना गाळप करणाऱ्या साखर...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...
कर्जमाफीची रक्कम द्या; अन्याथ लेखी द्यापुणे : २००८ मधील कर्जमाफीची रक्कम नाबार्डने...
नुकसानभरपाईची मागणी तथ्यांवर आधारित...नागपूर : नॅशनल सीड असोसिएशनने बोंड अळीला...
बदल्यांअभावी राज्यात कृषी... नागपूर : राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कृषी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
हवामान बदलाचा सांगलीतील द्राक्ष बागांना... सांगली  ः गेल्या दोन दिवसांपासून हवामानात...
साताऱ्यातील चौदाशेवर शेतकरी ठिबक...सातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
सोलापूर बाजारात कांद्याच्या दरात पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रब्बी पेरणीत बुलडाण्याची आघाडी अकोला  ः अमरावती विभागात यंदाच्या रब्बी...
कोल्हापुरात हिरवी मिरची तेजीतकोल्हापूर : येथील बाजारसमितीत या सप्ताहात हिरवी...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...