Online registration of 'server down' in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात ऑनलाइन नोंदणीचा ‘सर्व्हर डाउन`
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

जळगाव : जिल्ह्यात कडधान्य खरेदीसंबंधीची ऑनलाइन नोंदणी पाचोरा, अमळनेर, जळगाव येथे सुरू आहे. परंतु किचकट प्रक्रियेमुळे नोंदणी वेळेत होत नसल्याची स्थिती आहे. सर्व्हर डाऊन असते. त्यातच वेळ जातो. यामुळे रात्री उशिरापर्यंत संबंधित केंद्रात काम सुरू आहे.

जळगाव : जिल्ह्यात कडधान्य खरेदीसंबंधीची ऑनलाइन नोंदणी पाचोरा, अमळनेर, जळगाव येथे सुरू आहे. परंतु किचकट प्रक्रियेमुळे नोंदणी वेळेत होत नसल्याची स्थिती आहे. सर्व्हर डाऊन असते. त्यातच वेळ जातो. यामुळे रात्री उशिरापर्यंत संबंधित केंद्रात काम सुरू आहे.

जिल्ह्यात कडधान्य खरेदीसंबंधी सबएजंट म्हणून पाचोरा येथे भडगाव शेतकी संघ, अमळनेर येथेही शेतकरी संघ आणि जळगावात ‘अ` वर्ग सहकारी संस्था म्हणून ओळख असलेल्या कृषी औद्योगिक सहकारी संस्थेची नियुक्ती झाली आहे. याच संस्थांच्या विविध कार्यालयांमध्ये ऑनलाइन नोंदणी करून घ्यायची आहे. शेतकऱ्यांना नोंदणीसाठी उपस्थित राहायचे नाही. त्यांच्याकडून फक्त अर्ज स्वीकारले जात आहेत. त्यात बॅंक खाते क्रमांकासंबंधी पासबुकची झेरॉक्‍स, आधार कार्डची झेरॉक्‍स, सातबारा उतारा (पीक नोंदीचा) घेतले जात आहेत.

काही शेतकऱ्यांनी हे अर्ज चार दिवसांपूर्वी केंद्रात दिले, परंतु नोंदणी झाली, यासंबंधीचा संदेश भ्रमणध्वनीवर आलेला नाही. त्यामुळे नोंदणीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असून आर्थिक झळ पोचत आहे.

संदेश मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांकडून खरेदी केंद्रात धान्य खरेदी केली जात नाही. यासंदर्भात एका केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यास विचारले. ते म्हणाले, ‘‘एक अर्ज अपलोड करायला २० मिनिटे लागतात. रात्री उशिरापर्यंत कामकाज करावे लागते. नोंदणीची अडचण दुपारी येते. सर्व्हर डाऊन होते.``

इतर बातम्या
पुणे विभागात पाणीटंचाईची तीव्रता वाढलीपुणे : पावसाळा संपताच उन्हाचा चटका वाढल्याने पुणे...
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
निर्यात वाढविण्यासाठी कृषी विभाग...परभणी ः शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
बांगलादेशातील रेशीम उद्योग...प्राचीन काळी भारतीय उपखंडामधील रेशमी कापड हे जगभर...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
म्हैसाळ उपसाचे मागणीअभावी काही पंप बंदसांगली ः म्हैसाळ उपसा सिंचन आठवडाभरापूर्वी पंप...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
कमी पाऊस झाल्याने मनरेगा’च्या मजुर...नगर : पावसाने हात आखडता घेतल्याने खरीप हंगाम वाया...