Section News | Agrowon

Section News

परभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव सादर
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता. १७) पर्यंत जिल्ह्यातील १ लाख ८१ हजार ८ शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर केले आहेत. रब्बी पिकांसाठी विमा संरक्षण घेण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत विमा प्रस्ताव सादर करता येतील. या संदर्भात विमा कंपनीच्या सूत्रांनी माहिती दिली.

टॅग्स

करवीर तालुक्‍यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

कोल्हापूर : करवीर तालुक्‍यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, दऱ्याचे वडगाव जलाशयातील शेतीसाठी पाणी उपसा व बंदी कालावधी निश्‍चित झाला आहे. पंचगंगा पाटबंधारे उपविभागाचे सहायक अभियंता शशांक शिंदे यांनी ही माहिती दिली. 

महामार्ग सुरू होण्यापूर्वीच वाळूमाफिया सक्रीय
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

जळगाव ः जळगाव शहरातील वाढते अपघात आणि वाढत्या वाहतुकीची गरज म्हणून जळगाव शहराच्या बाहेरून राष्ट्रीय महामार्ग जात असून, भूसंपादित केलेल्या जागेवर मुरूम टाकून कच्चा रस्ता तयार झाला आहे. महामार्ग तयार होऊन दोन-तीन वर्षांनंतर जळगावकरांच्या उपयोगात येईल किंवा जळगाव शहरातील वाहतुकीवरील भार त्यानंतर कमी होण्यास मदत होईल. मात्र नव्या महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाळूमाफियांनी शेतातच डंपिंग ग्राऊंड करीत मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूसाठे तयार केल्याचे आढळून येत आहे.

शेतकऱ्यांनी जाणले कृषी तंत्रज्ञान
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

भंडारा : परंपरागत कृषी विकास योजनेतून तालुका कृषी अधिकारी अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) अंतर्गत २० शेतकऱ्यांनी साकोली कृषी विज्ञान केंद्रास भेट दिली. कृषीविषयक संशोधन कार्याची या वेळी शेतकऱ्यांनी माहिती घेतली.

कृषी विज्ञान केंद्र, साकोलीच्या प्रक्षेत्रावर विविध धान वाणांची लागवड करण्यात आली आहे. त्यांची उत्पादकता, वाढीसाठीचे पूरक तंत्रज्ञान, तूती लागवड, फिश, शेळीपालन, कुक्‍कुटपालन युनिट, अवजारे बॅंक, धान लागवडीच्या पद्धती, जैविक कीड व रोग्य व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या समस्यांचेही निरसन करण्यात आले. 

गाळपेर क्षेत्रातून मिळणार ४८ हजार टन चारा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चारा आपल्या जिल्ह्यात उत्पादन करावा, यासाठी सरकारने गाळपेर क्षेत्रावर लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी व संबंधित संस्थेने गाळपेर क्षेत्रात लागवड करण्यासाठी ग्रामसेवक, कृषी सहायक, पशुवैद्यकीय सहायक अधिकारी यांच्याकडे फॉर्म भरून द्यावा.
                                       - डॉ. व्ही. डी. गर्जे, 
                              जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

कोंबड्यांसाठी संतुलित खाद्यनिर्मिती आवश्यक
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पक्ष्यांना खाद्य देण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे खाद्य तयार करायचे आहे, याचा निश्चित आरखडा तयार करावा, कारण कोंबडी खाद्य चिक, ब्रॉयलर व लेयर अशा तीन प्रकारचे असते. कोंबडीच्या खाद्यात वापरावयाचा कच्चा माल कमीत कमी खर्चात चांगल्या दर्जाचा मिळवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

पोल्ट्री व्यवसायामध्ये एकूण खर्चाच्या ६० ते ७० टक्के खर्च फक्त खाद्यावर होतो. म्हणून पक्ष्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्याचे प्रमाण व त्या खाद्याची प्रत अतिशय महत्त्वाची असते. पक्ष्यांचे खाद्य भरडलेले बारीक असावे लागते.

पक्ष्यांना आहार देताना घ्यावयाची काळजी

माणिकडोह धरणातून पाणी सोडण्यासाठी आंदोलन
सोमवार, 17 डिसेंबर 2018

आपटाळे, जि. पुणे ः माणिकडोह धरणातून पाणी सोडण्यात आल्याने भविष्यात पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण होईल या भीतीने माणिकडोह धरणाच्या लाभ क्षेत्रातील गावांमधील शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कबाडवाडी माणिकडोह चौकात आंदोलन केले. आमदार शरद सोनवणे यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाणी कमी पडणार नसल्याची खात्री दिल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. 

पाणी बचत, दर्जेदार उत्पादनासाठी मल्चिंग पेपरचा वापर
सोमवार, 17 डिसेंबर 2018

पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत स्पर्धा करणाऱ्या तणांचे नियंत्रण होते. आच्छादनामुळे तापमान, अतिआर्द्रता नियंत्रित राहिल्यामुळे पीकवाढीला फायदा होतो. फळांचा आकर्षकपणा टिकून राहून दर चांगला मिळतो.   

फोटो गॅलरी

पशू सल्ला
रविवार, 16 डिसेंबर 2018

शेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा असावा जेणेकरून त्यांना ऊर्जेची कमतरता भासणार नाही. या काळात शेळ्या - मेंढ्यांची वाढ चांगली होत असते आणि वजनवाढीसाठी हा उत्तम ऋतू आहे, कारण हिवाळ्यात ऊर्जा कायम ठेवण्यासाठी त्यांचा खुराक वाढतो व त्याचा सकारात्मक परिणाम वजनवाढीवर दिसून येतो. परंतु, जर कमी होणाऱ्या तापमानाकडे लक्ष दिले नाही, तर शेळ्यांमध्ये मरतुकीचे प्रमाण वाढू शकते. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात शेळ्यांचे विण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे करडांची संख्या या काळात वाढू शकते. कमी तापमानात करडे दगावण्याची शक्यता जास्त असते.

दुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन करा
रविवार, 16 डिसेंबर 2018

पुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात दुष्काळजन्य परिस्थिती तयार झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी न घेतल्यास फळबागेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दुष्काळी स्थितीमध्ये फळबागांचे व्यवस्थापन करताना सूक्ष्म सिंचन, मटका सिंचन पद्धत, पाॅलिथिन आच्छादन अशा विविध पद्धतींचा वापर करण्याचे आवाहन पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालकांनी केले. 