Snake bite of 106 9 people in the district in 10 months | Agrowon

नाशिक जिल्ह्यात १० महिन्यांत १०६९ जणांना सर्पदंश
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

नाशिक : पावसाळा तसेच नंतर उकाड्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात साप आढळण्याचे तसेच सर्पदंशाचे प्रमाण वाढत असते. परंतु यंदा हे प्रमाण अधिक वाढल्याने पर्यावरण तज्ज्ञांकडून याची मीमांसा केली जात आहे. चालू वर्षी गेल्या दहा महिन्यांत जिल्ह्यात १०६९ जणांना सर्पदंश झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पैकी उपचारास विलंब तसेच इतर कारणांनी १४ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

हिवाळ्याच्या प्रारंभीच्या महिन्यांमध्ये प्रामुख्याने आक्टोबर हीटमध्ये उकाड्यामुळे साप थंड ठिकाणे तसेच मानवी वस्तीजवळ आढळतात. त्यामुळे सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते.

नाशिक : पावसाळा तसेच नंतर उकाड्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात साप आढळण्याचे तसेच सर्पदंशाचे प्रमाण वाढत असते. परंतु यंदा हे प्रमाण अधिक वाढल्याने पर्यावरण तज्ज्ञांकडून याची मीमांसा केली जात आहे. चालू वर्षी गेल्या दहा महिन्यांत जिल्ह्यात १०६९ जणांना सर्पदंश झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पैकी उपचारास विलंब तसेच इतर कारणांनी १४ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

हिवाळ्याच्या प्रारंभीच्या महिन्यांमध्ये प्रामुख्याने आक्टोबर हीटमध्ये उकाड्यामुळे साप थंड ठिकाणे तसेच मानवी वस्तीजवळ आढळतात. त्यामुळे सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते.

चालू वर्षी जून महिन्यात सर्पदंश रुग्णांची २०१ इतकी आहे, तर या महिन्यात ४ जणांचा मृत्यू झाला. मागील वर्षी जूनमध्ये १०१ जणांना दंश झाला होता. तर दोघांचा मृत्यू झाला होता. जुलैमध्ये १४९ तर ऑक्टोबरमध्ये १४० जणांना सर्पदंश झाला होता. या महिन्यात ३ जणांना आपले प्राण गमवावे लागले.

मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण खूप मोठे आहे. साप चावण्याचे प्रकार आदिवासी तसेच ग्रामीण भागात अधिक आहे. यासह शहरात प्रामुख्याने नदीकिनारी भागात वा शेतीला खेटून असलेल्या वस्त्या व मळे परिसरात हे प्रमाण जास्त आहे. पावसाळा सुरू होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो. त्याचबरोबर बिळामध्ये पाणी साचते.

त्यामुळे भक्ष्य शोधण्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात साप जून ते ऑक्टोबर या कालावधीत मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात. म्हणून या काळात नागरिकांनी साप दिसला तर घाबरून न जाता या आपत्कालीन परिस्थितीची शास्त्रीय माहिती घ्यावी, अशी जनजागृती विविध निसर्ग प्राणिप्रेमी संघटनांतर्फे करण्यात आली आहे.

ही काळजी घ्या
प्रामुख्याने घराच्या भिंती, कुंपणाच्या भिंती यांना पडलेली बिळे बुजवावी. घराच्या आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. खिडक्या, दरवाजे यांना लागून झाडांच्या फांद्या येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. गवतातून चालताना पायात बूट असावेत. अंधारातून जाताना नेहमी बॅटरी सोबत ठेवावी अशी काळजी घेण्याचे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
संत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...
श्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...
कळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...
मोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...
कोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
आता खाण्यातही क्रिकेट !क्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...
चीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...
संत्र्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्या,...अमरावती : सिट्रस इंडिया लिमिटेड नांदेड आणि...
ठिबकसाठी २ टक्के व्याजाने कर्जपुरवठा सांगली ः पाण्याची बचत व ऊस उत्पादनवाढीसाठी कमी...
‘भंडारदरा’ तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे...नगर : नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतील तालुक्‍यासाठी...
बोंड अळी नियंत्रणासाठी डोमकळ्या नष्ट करापरभणीः गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी...
धुळ्याच्या बुराई नदीवरील ३२ बंधाऱ्यांचे...धुळे : साक्री व शिंदखेडा तालुक्‍यांतून वाहणारी...
सहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून...सोलापूर : "सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत...
भाजीपाल्याची हंगामातील विक्रमी २२५ ट्रक...पुणे ः ९ आॅगस्टचा महाराष्ट्र बंद, शनिवार (ता. ११...
कंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...
पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे : सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या...
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी दोन...पुणे ः चालू वर्षी खरीप हंगामात फळबाग लागवड करू...